आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाबळ काॅलनीत कारने जाणाऱ्या महिलेचा अंदाज चुकल्याने कारसह दाेघे २० फूट खाेल खड्ड्यात काेसळल्याची घटना रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. ही कार बाहेती शाळेच्या मैदानात पडल्याने दाेघे किरकाेळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने शाळेला सुटी असल्याने मैदानात काेणीही नव्हते. अन्यथा माेठी दुर्घटना घडली असती.
महाबळ काॅलनीतील बाहेती हायस्कूलला वळसा घालून कार (एमएच १९ बीयू ३१८२) उताराने जात असताना चालकाला अंदाज न आल्याने ती कडेला गेली.वेळीच वाहनावर नियंत्रण न मिळू शकल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या २० फूट खाेल असलेल्या मैदानात काेसळली. या वेळी कडेला निंबाचे झाड मुळासकट काेसळले. झाड असल्याने वाहनाचे पुढच्या बाजूचे नुकसान झाले. तर चालकासह दाेघांना छातीला मार लागल्याचे काॅलनीतील रहिवाशांनी सांगितले. कारमालकाची माहिती उपलब्ध हाेऊ शकली नसली तरी कार महिला चालवत असल्याचे सांगण्यात आले.
भिंत नसल्याने धाेका : महाबळ काॅलनीत पूर्वीचे काँक्रीटचे रस्ते आहेत. उंच सखल भाग असल्याने रस्त्याला प्रचंड उतार आहे. या रस्त्याच्या कडेलाच शाळेचे मैदान आहे. मैदानाची संरक्षण भिंत नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. शाळा प्रशासनाने काही अंतरापर्यंत संरक्षण भिंत उभारली आहे; परंतु वळणावर भिंत नसल्याने धाेका आहे.
रस्त्याखालची जमीन पाेखरली : काँक्रीटचा रस्ता असला तरी त्या खालील माती निघायला सुरुवात झाली आहे. सुमारे दीड फुटापर्यंतचा काँक्रीटचा रस्ता अधांतरित आहे. अवजड वाहन त्यावरून गेल्यास काेणत्याही क्षणी माेठे वाहन २० फुटावरून खाली काेसळण्याची दाट शक्यता आहे. माेठा अपघात हाेण्यापूर्वीच शाळा प्रशासन व मनपाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा अॅड. महेश दंडगव्हाळ, अभय सहजे, मेघश्याम भिरूड, रवींद्र देशपांडे आदींनी या वेळी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.