आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरसंक्रांत:‘मूजे’मध्ये ‘चला आरोग्याचे वाण लुटू‎ या'' अंतर्गत स्नेहमिलन साेहळा रंगला‎

जळगाव‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम‎ डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड‎ नॅचरोपॅथीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही‎ मकरसंक्रांतीनिमित्त ‘चला‎ आरोग्याचे वाण लुटू या'' या थीम‎ अंतर्गत स्नेहमिलनाचा कार्यक्रम‎ झाला. या वेळी उपस्थित सर्व‎ महिलांना हळदी-कुंकू व आरोग्याचे‎ वाण म्हणून आकर्षक अॅक्युप्रेशर‎ रिंग व २३ ते ३० जानेवारीपर्यंत सात‎ दिवस माेफत ऑनलाइन योग‎ प्रशिक्षण तज्ज्ञ योग प्रशिक्षकांद्वारा‎ दिले जाणार आहे.‎ कार्यक्रमाच्या संयोजिका म्हणून‎ प्रा. ज्योती वाघ, प्रा. सोनल महाजन‎ यांनी जबाबदारी सांभाळली.‎ कार्यक्रमाची सुरुवात ओंकार‎ प्रार्थनेने करण्यात आली.

त्यानंतर‎ विद्यार्थिनींनी नृत्य, गायनासह‎ मनोरंजनात्मक खेळ सादर केला.‎ प्रास्ताविक प्रा. सोनल महाजन यांनी‎ केले. शांतीपाठाने कार्यक्रमाची‎ सांगता झाली. या वेळी सोहम योग‎ अॅण्ड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ.‎ देवानंद सोनार, प्रा. अनंत महाजन,‎ डॉ. शिल्पा बेंडाळे, प्राचार्य डॉ. गौरी‎ राणे, उपप्राचार्य करुणा सपकाळे,‎ प्रा. कल्पना नंदनवार, जयश्री‎ सोनार, मुख्याध्यापिक प्रणिता‎ झांबरे, डॉ. देवानंद सोनार, प्रा. अनंत‎ महाजन उपस्थित होते. अमिता‎ सोमाणी, सायली अजनाडकर यांनी‎ सूत्रसंचालन केले. शीतल पाटील‎ यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...