आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दृष्टिदोषापासून बचावासाठी विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशावेळीच तपासणी अनिवार्य करण्याची गरज

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांमधील वाढता दृष्टीदोष अंधत्वासाठी कारणीभूत ठरत आहे. दृष्टीदोषामुळे अंधत्वाचा धोका देखील वाढला असून या समस्येपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशावेळी नेत्र तपासणी अनिवार्य करावी अशी मागणी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन यांची भेट घेत केली.

शालेय मुलांमध्ये मैदानी खेळाचा अभाव, मोबाइल, संगणक, टीव्हीचा अतिवापर दृष्टीदोषासाठी कारणीभूत ठरत आहे. अशातच काही मुलांच्या दृष्टीदोषाचे वेळीच निदान झाले नाही तर त्यांच्यात कायमचा दृष्टीदोष राहू शकतो. त्यामुळे डोळा आळशी होऊन तिरळेपणा उद्भवू शकतो. परिणामी अशा बालकांना भविष्यात पोलिस, सैन्यदल, रेल्वे या ठिकाणच्या नोकरीपासून वंचित राहावे लागते.

दृष्टिदोषाने १९.७०% मुलांमध्ये अंधत्व दृष्टीदोषामुळे १९.७० % मुलांमध्ये अंधत्व येऊ शकते. मोतीबिंदूनंतर अंधत्वाचे हे दुसरे कारण डोकेवर काढत आहे. यासाठी वेळीच निदान व योग्य चष्म्याचा वापर करून होणारे नुकसान टाळू शकतो. त्यामुळे प्राथमिक शाळेत मुलांची पुढील वर्गात प्रवेश घेताना दृष्टी तपासणी अनिवार्य करावे. त्यामुळे वेळीच दृष्टीदोषाचे निदान होऊन दृष्टीदोष असलेल्या बालकांना वेळीच चष्मा देऊन व उपचार करून त्यांची दृष्टी वाचवू शकतो असे डॉ. पाटील यांनी सांगितले. या वेळी डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. मनोज टोके, डॉ. सुनील पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...