आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैसे थे परिस्थिती‎:फुले मार्केटमध्ये पुन्हा‎ हाॅकर्सनी थाटली दुकाने‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून‎ आेळख असलेल्या सेंट्रल फुले‎ मार्केटमधील हाॅकर्संनी दाेन दिवसांच्या‎ खंडानंतर शनिवारी दुपारनंतर ७० टक्के‎ व्यावसायिकांनी दुकाने थाटली. दाेन‎ दिवसांपूर्वी दाेन गुन्हेगारांनी दहशत‎ माजवल्यानंतर दुकानदारांनी केलेल्या‎ तक्रारीनंतर पाेलिस व मनपाने कारवाई‎ केल्याने हाॅकर्सने दुकाने थाटली नव्हती.‎ फुले मार्केटमध्ये दाेन तरुण गुन्हेगारांनी‎ दुकानदारांना धमकावल्यानंतर सर्व‎ दुकानदारांनी एकत्र येऊन दुकाने बंद ठेवत‎ विराेध दर्शवला हाेता. त्यासाेबत‎ महापालिका व पाेलिस प्रशासनाला‎ निवेदनाद्वारे तक्रार केली हाेती.

पाेलिस‎ प्रशासनाने याची दखल घेऊन शुक्रवारी‎ त्या दाेघा गुन्हेगारांना ताब्यात घेऊन‎ त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करत‎ दाेघांना बेड्या घालून ज्या भागात दहशत‎ पसरवली हाेती. त्या भागातून हातात‎ बेड्या घालून फिरवले हाेते. शनिवारी‎ मनपाच्या अतिक्रमण विभागाला अर्धा‎ दिवसाची सुटी असल्याने दुपारनंतर फुले‎ मार्केटमध्ये सकाळपासून गेलेले‎ अतिक्रमण विभागाचे कर्मचारी माघारी‎ परतल्यानंतर हाॅकर्सनी पुन्हा दुकाने‎ थाटल्याने जैसे थे परिस्थिती शनिवारी या‎ मार्केटमध्ये दिसून आली.‎

बातम्या आणखी आहेत...