आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • In Private Hospital And Government Hospital, 50% Of Patients Come From Typhoid; Patients Suffered From Fever, Vomiting, Diarrhoea| Marathi News

शासकीयसह खासगी रुग्णालये टायफॉइडच्या रुग्णांनी फुल्ल:खासगीत 50% रुग्ण येताहेत टायफॉइड चे; ताप, उलट्या, जुलाबने रुग्ण झाले त्रस्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. सध्या टायफॉइड ची साथ सुरू आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ताप, उलट्या, जुलाबाची लक्षणे दिसून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालये टायफॉइडच्या रुग्णांनी फुल्ल आहे. शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीत २० टक्के तर खासगी रुग्णालयांच्या ओपीडीत सरासरी ५० टक्के रुग्ण टायफॉइडचे आढळताहेत.

टायफॉइड हा पावसाळ्यात हाेणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफी हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो. दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाणी प्यायल्याने जीवाणूचा प्रादुर्भाव होऊन टायफॉइडची लागण होते. उच्च तापमान दर्शवणारा ताप किंवा कमी-अधिक होणारा ताप ही विषमज्वराची डळक लक्षणे आहेत.

बातम्या आणखी आहेत...