आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:बाभळेनाग बैठकीत शेतकरी संघटना‎ शाखा स्थापन, कार्यकारिणीही जाहीर‎

पारोळा‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्यावाचून शेती नाही, गावाच्या‎ शिवारात एक नाही तर दोन दोन‎ धरणे आहेत; परंतु अपूर्ण पाणलोट‎ क्षेत्र असल्याने ते परिपूर्ण भरत‎ नाहीत. त्यामुळे गावापासून जवळच‎ असलेल्या नगाव गावातील‎ शिवारातून पाटाचे जाणारे पाणी‎ पाटचारीच्या माध्यमातून या धरणात‎ सोडले तर या गावाचा कायापालट‎ होणार, यात शंका नाही. यासाठी‎ शेतकऱ्यांनी एकजूट करून संघटन‎ केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या‎ गावाचा पाण्याचा प्रश्न‎ सोडवण्यासाठी या शाखेच्या‎ माध्यमातून प्रयत्न करू, असे‎ प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी‎ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील‎ देवरे यांनी केले.‎ बाभळेनाग येथे शेतकरी‎ संघटनेच्या शाखा स्थापनेच्या‎ कार्यक्रमात ते बोलत होते.‎ प्रास्ताविक नाना पाटील यांनी केले.

शाखेच्या नियोजन संदर्भात तसेच‎ शाखा शेतकऱ्यांना किती लाभदायी‎ आहे, याचे तालुकाध्यक्ष डॉ. विनोद‎ चौधरी यांनी महत्त्व पटवून‎ सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून‎ गावातील सर्व आजी-माजी सरपंच,‎ ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे‎ चेअरमन, सदस्य व ज्येष्ठ नागरिक,‎ युवक उपस्थित होते. याप्रसंगी‎ बाभळेनाग गावात महाराष्ट्र शेतकरी‎ संघटनेची शाखा स्थापन करण्यात‎ आली. या वेळी गावातील शेतकरी‎ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मयूर‎ ठाकूर यांनी आभार मानले.‎ ‎ शाखाध्यक्ष म्हणून मयूर ओंकार‎ ठाकूर, कार्याध्यक्षपदी सागर‎ पुंडलिक माळी, माहिती प्रमुख‎ म्हणून अमोल साहेबराव बाविस्कर,‎ उपाध्यक्षपदी सागर वसंत माळी,‎ संपर्क प्रमुखपदी समाधान पुंडलिक‎ माळी, खजिनदारपदी धनराज‎ नारायण माळी, महासचिवपदी‎ राकेश माळी, सचिव म्हणून‎ भीमराव भावलाल माळी, प्रसार‎ माध्यम प्रमुख रवींद्र सुरेश माळी,‎ सल्लागार म्हणून हिरालाल लक्ष्मण‎ मरसाळे यांचा समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...