आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • In The Book Introductory Competition, Keskar Won The First Place In The Open Group. Or. Library Activities; Devesh More Tops The College Group | Marathi News

स्पर्धा:पुस्तक परिचय स्पर्धेमध्ये खुल्या गटात केसकरांनी पटकावला प्रथम क्रमांक, व. वा. वाचनालयाचा उपक्रम; महाविद्यालयीन गटात देवेश मोरे अव्वल

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व.वा. वाचनालयाच्या सभागृहात रविवारी वाचनालयाने घेतलेल्या पुस्तक परिचय स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत खुला गट व महाविद्यालयीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात खुल्या गटात गीता केसकर तर महाविद्यालयीन गटात देवेश मोरे हे प्रथम आले.

पारितोषिक वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले. कार्यक्रमात मायादेवी धुप्पड यांनी मार्गदर्शन केले. तसेच सुनंदा परांजपे, विजया वैद्य यांनी मनोगतातून स्पर्धेचे परीक्षणाबाबत सांगितले. गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत मांडले. स्पर्धकांतर्फे चंचल धांडे हिने मनोगत व्यक्त केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक शुभदा कुलकर्णी यांनी केले. शैलजा चव्हाण यांनी आभार मानले. अॅड. प्रताप निकम, प्रताप निकम, प्रताप चौधरी, विजय पाठक, श्यामकांत धवसे, सुरेखा सूर्यवंशी उपस्थित होते.

समाजभान ठेवून लेखन करावे
साहित्यिकांनी लेखन करताना आपले साहित्य समाजात जाणार आहे याचे भान ठेवून लेखन करावे. साहित्यातून माणुसकीच्या भिंती मजबूत करण्याचे काम वाचनालये करतात. व. वा. वाचनालय हे जळगावची सांस्कृतिक ओळख सांगणारे वाचनालय आहे. वाचनालयातील ग्रंथांच्या माध्यमातून वाचनसंस्था व जीवनमूल्य प्राप्त होत असते, असे माया धुप्पड म्हणाल्या.

पारितोषिक विजेते
खुला गट- गीता केसकर प्रथम, वैशाली पाटील द्वितीय, दीपा देशपांडे तृतीय तर नूतन चित्ते, सुषमा विश्वरत्न, अंजली झोपे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. महाविद्यालयीन गटात देवेश मोरे प्रथम, राधिका बोरसे द्वितीय, चंचल धांडे तृतीय.

बातम्या आणखी आहेत...