आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजिल्हा स्पर्धा:स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीत पुण्याची जाेडी ठरली अव्वल; वाशिम द्वितीय तर जळगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. त्यात पुरुष दुहेरीत पुण्याची जोडी प्रथम, वाशिम द्वितीय, जळगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.खान्देशात पाच स्क्वॅश कोर्ट एवढ्या कमी कालावधीत उभारणे आणि त्याला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल खेळाडू दयानंद कुमार यांनी आयोजकांचे कौतुक केले.

माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित (जिल्हा क्रीडा अधिकारी), अध्यक्षस्थानी केसीई सोसायटी उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, डॉ. प्रदीप खांडे (अध्यक्ष महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन), दयानंद कुमार, (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना) व सचिव, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन, रंजीत भारद्वाज, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, (सचिव, जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशन) प्राचार्य स. ना. भारंबे, प्राचार्य अशोक राणे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. बेलोरकर यांनी केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. अखिलेश शर्मा यांनी केले. आभार नीलेश जोशी यांनी मानले. पारिताेषिक वितरणाने स्पर्धेचा समारोप झाला.

बातम्या आणखी आहेत...