आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगर हुडकाेवासीयांनी व्यक्त केला संताप‎:पाण्यासाठी मध्यरात्री आयुक्त,‎ नगरसेवकाच्या घरावरच धडक‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हाॅल्व्हमनचा अपघात झाल्याने‎ शिवाजीनगरातील हुडकाे भागातील‎ पाण्याचे नियाेजन विस्कळीत झाले‎ आहे. संतप्त नागरिकांनी साेमवारी‎ मध्यरात्री आयुक्तांंसह नगरसेवकाच्या‎ घरावर माेर्चा काढला. मंगळवारी‎ पहाटेपासून अग्निशमन बंबाने‎ पाणीपुरवठा करण्यात आला.‎ वाघूर धरणात ७६ टक्के पाणीसाठा‎ आहे. दाेन वर्षे पुरेल एवढे पाणी धरणात‎ असतानाही शहरातील काही भागात‎ पाणीपुरवठ्याचे नियाेजन विस्कळीत‎ झालेे आहे. शिवाजीनगरातील हुडकाे‎ भागात पाण्याचे नियाेजन करणाऱ्या‎ व्हाॅल्व्हमनचा अपघात झाला. त्यांच्या‎ जागेवर नवीन व्हाॅल्व्हमनची नियुक्ती‎ करण्यात आली.