आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगृहात रवागनी:तीन महिन्यात ११ बेपत्ता बालकांना सुरक्षितपणे पोहोचवले पालकांकडे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेगवेगळ्या कारणांनी रेल्वेस्थानक परिसरात हरवलेल्या बालकांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेऊन बालगृहात रवागनी केली आहे. यात जून ते ऑगस्ट या तीनच महिन्यात ११ बालकांचा समावेश आहे. यात चार मुली व सात मुले आहेत.

प्रवास करताना दुसऱ्या रेल्वेगाडीत बसल्याने, कुटंुबीयांवर रागावून, धाकापोटी घर सोडून पळून जाणे अशा विविध कारणांमुळे रेल्वेस्थानकावर बालक हरवतात. बऱ्याचवेळा पळून आलेली मुले पोलिसांची मदत घेत नाहीत. ते रेल्वेस्थानक परिसरातच गुजारन करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा मुलांना ओळखून ताब्यात घेण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची आहे. त्यानुसार जून महिन्यापासून ११ बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या बालकांना समतोल प्रकल्प बालसहायता केंद्राचे समन्वयक प्रदीप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात येते. तेथून बालकांना बाल निरीक्षक गृहात ठेऊन त्यांच्या पालकांचाही शोध घेतला होता. ११ बालकांना पालकांच्या ताब्यात दिले.

बातम्या आणखी आहेत...