आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकोद परिसरात ऊस शेतातच उभा तर कामगार मात्र परतीच्या मार्गावर:वाकोद परिसरात ऊस शेतातच उभा तर कामगार मात्र परतीच्या मार्गावर

वाकोद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर मानला जात असतानाच ऊस गाळपासाठी जात नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे. गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर असून ऊसतोड कामगार देखील परतीच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. वाकोद व परिसरातील शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी या कारखान्याशी करार केला होता. परंतु, आज खरीप हंगाम तोंडावर आला असताना जवळपास सर्वच ऊसतोड कामगार गावाकडे परतीच्या मार्गावर परतले आहेत. वाकोद येथील काही शेतकऱ्यांनी ८०० रूपये टन अशा जादा मजुरीने या कामगारांकडून तोडणी केलेली आहे. परंतु, आठ ते दहा दिवस झाले परंतु कारखानदार ट्रक नसल्याचे कारण पुढे करत आहेत. तर मजुरांचे मुकादम उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. पाऊस पडला तर ऊस वाहतूक होणार नाही, त्यामुळेच परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...