आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेडिओ ऑरेंज व श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑरेंज एक्स्पो-२०२२चे सागर पार्क येथे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १७ ते २१ मार्च दरम्यान आयोजित ऑरेंज एक्स्पोमध्ये ऑटोमोबाइल, लाइफस्टाइल, कन्झ्युमर गुड्स, एंटरटेन्मेंट आणि फूडची धम्माल मेजवानी जळगावकरांसाठी असणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रेडिओ ऑरेंजचे नॅशनल बिझनेस अजय मोकडे, नॅशनल क्रिएटिव्ह हेड मिलिंद पाटील, रिजनल बिझनेस हेड पराग चौधरी, नॅशनल फायनान्स हेड योगेश श्रीवास्तव, रेडिओ ऑरेंजच्या रेडिओ जॉकीससह संपूर्ण जळगावची सेल्स टीम उपस्थित होती. ऑरेंज एक्स्पोला अभिजित रियेलेटर्स अॅड इंफ्राव्हेन्चर प्रायव्हेट लिमिटेड, एकनाथ ऑटोमोबाइल्स, इन्फिनिटी एनटरप्रायझेस, मोहारीर स्कोडा, इव्हेंट पार्टनर कन्सेप्ट अॅडव्हर्टायझर्सचे सहकार्य लाभले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.