आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा ११ व १२ नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यात २८८ मॉडेल्स व पोस्टर्स सादरीकरण केले जाणार आहे. या स्पर्धेची तयार पूर्ण झाली आहे. सोमवारी कुलगुरु प्रा. डाॅ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.
प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील व समित्यांचे समन्वयक उपस्थित होते. गेल्या महिन्यात जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा झाली. या स्पर्धेतून निवडण्यात आलेले स्पर्धक आता विद्यापीठस्तरीय आविष्कारमध्ये सहभागी होणार आहेत. ४४५ विद्यार्थ्यांद्वारे २८८ मॉडेल्स व पोस्टर्सचे सादरीकरण या दोन दिवसीय महोत्सवात हाेईल.
या स्पर्धेत २५४ विद्यार्थिनी व १९१ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शेती आणि पशूपालन या विषयात ३४ तर वाणिज्य व व्यवस्थापन आणि विधी ३२, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयात ३०, मानव्य विद्या भाषा आणि ललितकला विषयात ६०, औषधीनिर्माण विषयात ४४ आणि निव्वळ विज्ञान विषयात ८८ अशा एकूण २८८ प्रवेशिका स्पर्धेत आहेत.
शनिवारी पारिताेषिक वितरण
स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते होईल. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दिवसभर आपल्या पोस्टर व मॉडेल्सचे सादरीकरण विद्यार्थी करतील.शनिवारी दुपारी ४ वाजता या स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.