आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत संलग्नित महाविद्यालये व मान्यता प्राप्त परिसंस्थांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अध्यादेश १६३ व अध्यादेश रक्तदान अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर गुणांच्या याद्या व हमीपत्र ई-पद्धतीने सादर करावे अशा सूचना विद्यापीठातर्फे देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२मध्ये राष्ट्रीय छात्र सेना व आंतरविद्यापीठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यापीठ कलावंत म्हणून सहभाग नोंदवून उल्लेखनीय कार्य केलेले कलावंत विद्यार्थी यांना विद्यापीठ अध्यादेश १६३ अन्वये १० गुण व १ सप्टेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या दरम्यान रक्तदान केले असल्यास त्यांना विद्यापीठ अध्यादेश रक्तदान तरतुदीनुसार २ गुण देण्यात यावे.
संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणयाद्या तयार करून त्या ई-पद्धतीने सादर कराव्या. गुणयाद्यांची प्रत अचूक असल्याची खात्री प्राध्यापकांनी करावी. डाटा विद्यापीठास ऑनलाइन पाठवावा. दरम्यान ऑनलाइन डाटा १५ जूनपर्यंत सबमिट करावयाचा असून विद्यापीठात हार्ड कॉपी १५ ते २५ जून दरम्यान जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.