आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच:गुन्हेगाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना पीएसआय अटकेत, जळगाव तालुक्यातील मेहुणबारेतील घटना

जळगाव/चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांत संशयित असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक केली.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला योगेश जगन्नाथ ढिकले (३२, रा. जिजाईनगर, मेहुणबारे)असे या पोलिसाचे नाव आहे. मेहुणबारे येथील २७ वर्षीय तरुणावर गेल्या वर्षी खुनाचा गुन्हा दाखल आहे. तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात खंडणी, जबरी लूट, प्राणघातक हल्ला यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर पाठवणे, गुन्ह्यात मदत करणे, पोलिस ठाण्यात दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक ढिकले याने गुरुवारी सकाळी तक्रारदाराकडून साडेचार लाख रुपयांची लाच मागितली. एवढे पैसे देऊ शकत नसल्याने तक्रारदाराने तडजोड करून एक लाख रुपये देण्याचे सांगितले. त्यानुसार ठरलेल्या दिवशी ढिकले याला अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...