आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामार्गावर एका वाहनचालकाने कट मारल्याने पाळधी येथील दुचाकीस्वार प्रौढ ट्रकसमोर धडकला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न ट्रकचालकाने केला. मात्र, त्यात अवजड वाहतूक करणारा हा ट्रक रस्त्याच्या खाली उलटला. या विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महामार्गावरील बिबानगरजवळ मराठा हॉटेलसमोर घडली.
नाना नथ्थू माळी (वय ३८, रा. पाळधी) असे मृत युवकाचे नाव आहे. तो ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. साेमवारी ताे जळगाव येथून पाळधी येथे एमएच-१९, डीक्यू-८७४९ या क्रमांकाच्या दुचाकीवर घरी जात होता. बिबानगरजवळ मराठा हॉटेलसमोर धुळ्याकडून येत असलेल्या आरजे-०१, जीबी-६४६५ या टाइल्स घेऊन जात असलेल्या ट्रकला त्याच्या दुचाकीची धडक बसली. या अपघातात ट्रकचे चाक नाना माळीच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातात ट्रकचे अॅक्सल तुटले. त्यामुळे टाइल्स असलेला ट्रॉला हॉटेलसमोरील खड्ड्यात जाऊन पडला. ट्रकचे समोरील केबिन रस्त्यावरच राहिल्याने चालकाला खरचटलेही नाही. अपघातानंतर महामार्गावर आहुजानगरपर्यंत अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रकचालक घनश्याम मगनलाल माली (रा. कोचील, ता. किशनगड, राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच मृताच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मृत युवकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.
पहिला दावा : अचानक ट्रकचे पुढील टायर फुटले
बिबानगरजवळील मराठा हॉटेलसमोरच अपघात झाला. त्यामुळे हॉटेलचे मालक व कामगार या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनी सांगितले की, धुळ्याकडून ट्रक येत होता. ट्रकचे टायर फुटल्यासारखा मोठा आवाज आला. त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. या दरम्यान समोरून येत असलेल्या नाना माळी हा दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला असे सांगितले.
दुसरा दावा : टायर फुटले नाही, अर्जंट ब्रेक दाबले
‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली असता ट्रकसमोरील उजव्या चाकात हवा कमी असल्याचे दिसले. ट्रॉला खड्ड्यात पडल्याने आवाज झाला होता. टाइल्स घेऊन गुजरात येथून हैदराबाद येथे चाललो होतो. नानाच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीस्वाराने कट मारला. त्यात त्याचे नियंत्रण सुटले आणि तो ट्रकसमोर आला. त्याला वाचवण्यासाठी अर्जंट ब्रेक दाबले; मात्र, तो चाकाखाली आल्याचा दावा ट्रकचालकाने केला महमार्गावरील घटनास्थळी नाना माळी यांची पडलेली दुचाकी. तर दुसऱ्या छायाचित्रात ट्रकच्या टायरची कमी झालेली हवा.
हॉटेलसमोरील खड्ड्यात जाऊन पडला. ट्रकचे समोरील केबिन रस्त्यावरच राहिल्याने चालकाला खरचटलेही नाही. अपघातानंतर महामार्गावर आहुजानगरपर्यंत अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रकचालक घनश्याम मगनलाल माली (रा. कोचील, ता. किशनगड, राजस्थान) याला ताब्यात घेतले आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच मृताच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मृत युवकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई असा परिवार आहे.
मृताच्या भावाची फिर्याद
मृताचा मोठा भाऊ प्रभाकर नथ्थू माळी (रा. पाळधी) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रकचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे भरधाव वेगाने वाहन चालवले. नाना माळीच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्याच्या गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.