आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभ:वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये वाढीव कोटा; विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाचा २० जणांना फायदा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वर्ग-४ (शिपाई) ते वर्ग-३ (कनिष्ठ सहायक) कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीचा कोटा २५ वरून ५० टक्के करण्यात आला आहे. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

राज्य शासनाच्या सन २०१६ मध्ये एका निर्णयात वर्ग-४च्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या कोटा वाढवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या संदर्भात शासन निर्णय, विद्यापीठ कायद्याचा आधार घेत हा चांगला निर्णय घेतला आहे. आता विद्यापीठात ४० वर्ग-४चे कर्मचारी नोकरी आहे. त्यातील निम्म्या म्हणजेच ४० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेचे स्वरूप आदी मापदंड असणार आहे. त्यासाठी विशिष्ट समिती गठीत करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नियाेजन सुरू झाले आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंद
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयामुळे २० कर्मचाऱ्यांना माेठा फायदा हाेणार आहे. त्यामुळे हे कर्मचारी आनंदीत झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...