आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात चोरट्यांनी एटीएम मशिनच उचलून नेले:धानोऱ्यात इंडीकॅश एटीएम मशिन चोरीला, दोन वर्षात तिसऱ्यांदा एटीएम फुटीची घटना, गावासह जिल्ह्यांत खळबळ

धानोरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जळगाव बसस्थानकवर असलेले इंडीकॅश बँकेचे एटीएम बुधवारच्या मध्यरात्री दरोडा टाकून उचलून नेण्यात आले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एटीएममध्ये अंदाजे दिड लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. सदरील एटीएम लुटीचा प्रकार हा आज उघडकीस आला आहे. एटीएमच्या आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील पोलीस पाटलांना माहिती दिली.

घटनास्थळी अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण दांडगे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, कदीर शेख व कर्मचारी घटनेची पाहणी करत तपास करत आहे. पोलीसांनी आजुबाजूच्या दुकांनातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात त्यांना 21 ऑक्टोंबर रोजी रात्री 2.23 वाजता एक मोठा ट्राला जळगावच्या दिशेने तोंड करून उभा आहे.

दोन वर्षात तिनदा फोडले एटीएम
गेल्या दोन वर्षात इंडीकॅशचे एटीएम तीन वेळा फोडण्यात आले आहे. यावेळी संबंधित अधिकारी यांनी पोलिसात तक्रार देत नाहीत अशीही माहिती समोर येत आहे. तरी संबंधित घटनेने खडबळ उडाली असुन, पुढील तपास पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...