आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दिवाळीसाठी रेडिमेड कपड्यांना इंडाे-वेस्टर्न टच पुरुषांचा कल कुर्ता, ट्रॅडिशनल शेरवानीकडे; महिलांना भावतेय सिल्क पैठणी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेला तेजी आली आहे. यंदा रेडिमेड कपड्यांना इंडाे-वेस्टर्न टच असून ताे आकर्षण ठरताे आहे. पुरुषांचा कल ट्रॅडिशनल शेरवानी, कुर्ता, पायजमाकडे अधिक दिसताेय. महिलांची पसंती सिल्क पैठणीला जास्त आहे. ही पैठणी एक हजारापासून ते पंधरा हजारांपर्यंत उपलब्ध आहे. माेरपंखी व गुलाबी रंगाला त्यात अधिक मागणी आहे.

दसऱ्याला दाेन दिवस उरल्याने बाजारात कपडे खरेदीसाठी प्रचंड गर्दी हाेते आहे. सध्या रेडिमेड कपडे विकत घेण्याचा ट्रेंड महिला-युवतींत वाढला आहे. प्रत्यक्ष दुकानात जाऊन डिझायनर आणि स्टायलिश कपडे आवडत्या रंगसंगतीनुसार खरेदी केले जाताहेत. एकाच ठिकाणी हव्या त्या प्रकारातील कपडे विकत घेता येतात.

सेंट्रल फुले मार्केटमध्ये तर पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी हाेते आहे. रेेडिमेड कपड्यांना यंदा सर्वाधिक मागणी आहे. कोरोनानंतर सर्व सण पुन्हा उत्साहात साजरे करता येणार असल्याने अधिक उत्साह आहे. साड्यांपासून ते अनारकलीपर्यंत प्रत्येकात नवनवीन व्हरायटी पाहायला मिळते. डिझायनर साडी, अनारकली, घागरा, पंजाबी ड्रेस, कुर्ता विथ प्लाझो, लेहंगा असे विविध कपडे महिला-युवती अधिक खरेदी करताहेत.

जिन्स, टी-शर्टची विक्री वाढली
दसरा, दिवाळीसाठी हटके आणि वेगळी स्टाइल करावी यावर अधिक भर असतो. यंदा रेडिमेडमध्येही इंडो-वेस्टर्न टच देण्यात आला आहे. पारंपरिकतेच्या जोडीला पाश्चात्त्य डिझाइन्स अवलंब करत हटके डिझाइन्स तयार करण्यात आले आहेत. जिन्स, टी-शर्टची विक्रीही वाढली आहे.

पुरुषांचा कल ट्रॅडिशनलकडे
जिन्स-शर्ट, कुर्ता-पायजमा, ट्रॅडिशनल शेरवानी, मोदी जॅकेट आणि ब्लेझर अशा आउटफीटमध्ये इंडो-वेस्टर्न टचवर युवक भर देताहेत. कुर्ता-पायजमा, शेरवानीतील हटके डिझाइन्सना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे आकर्षक रंगसंगती असलेला प्रिंटेड कुर्ता यंदा अधिक भाव खाताे आहे.

घागराला मागणी : काेराेनानंतर नवरात्राेत्सव दणक्यात साजरा हाेताे आहे. या पार्श्वभूमीवर मध्यम किंमत असलेल्या घागराची मागणी दुपटीने वाढली. डिसेंबर महिन्यापासून लग्नतिथी सुरू होत असल्याने साड्यांना विशेष मागणी वाढली आहे. काठपदराच्या साड्यांची जागा आता सिल्क आणि पैठणीने घेतली.

बातम्या आणखी आहेत...