आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार क्षमता वाढणार:विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढण्यास प्राध्यापकांना इन्फोसिस देणार धडे

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याच्या इन्फोसिस कंपनीत खान्देशातील ६० प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेथून परतल्यानंतर हे प्रशिक्षीत प्राध्यापक आपल्या महाविद्यालयातील प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. इन्फोसिसच्या ‘सीएसआर’मधून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढणार आहे. प्राध्यपकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती इन्फोसिसला कळवावी लागेल.

‘प्रोजेक्ट जेनेसिस फॅकल्टी डेव्हलपमेंट’ नावाचा हा उपक्रम आहे. ‘ट्रेन द ट्रेनर’ या मॉडेलने खान्देशातील प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान इन्फोसिस कंपनीत प्रशिक्षणवर्ग होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...