आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:कॅन्सरग्रस्तांना इनरव्हील क्लब‎ जळगावने दिला मदतीचा हात‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू‎ जेनतर्फे गुरुवारी चांडक कॅन्सर हॉस्पिटल‎ येथे चॅरिटी इव्हेंट-सेलिब्रेशन ऑफ नॉक‎ आऊट कॅन्सर अंतर्गत कॅन्सरग्रस्त‎ रुग्णांना मदत देण्यात आली. रोहिणी शिंदे,‎ ज्योती पाटील, शोभाबाई कोळी,‎ छज्जुलाल पटेल, मंगला जैन या रुग्णांना‎ ही मदत देण्यात आली.‎ कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी क्लबतर्फे‎ विविध गीत गायन व नृत्याच्या चॅरिटी‎ शाेचे आयाेजन करण्यात आले हाेते.

यात‎ पवन झंवर व त्यांच्या कलापथकाने‎ विविध गीते सादर केली हाेती. या शाे‎ मधून जमा झालेली रक्कम ही‎ कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात‎ आली. कार्यक्रमास इनरव्हील क्लब‎ ऑफ जळगाव न्यू जेनचे प्रेसिडेंट इशिता‎ दोषी, खजिनदार गुंजन कथुरिया, डॉ.‎ नीलेश चांडक, डॉ. श्रद्धा चांडक, विनय‎ चांडक, नेहा संघवी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...