आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा संकुल:भुसावळ क्रीडा संकुल कामास होणाऱ्या विलंबाबाबत चौकशी

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ येथे क्रीडा संकुलासाठी दोन वर्षांपासून ७ कोटी ६५ लाखांचा निधी प्राप्त होऊन कामाने विलंब होण्यास जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाईचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय सावकारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर याबाबतचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी नाशिकला पाठवल्याची बाब सभागृहाच्या लक्षात आणून देत निधी प्राप्त होऊन काम अद्याप का सुरु झाले नाही याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

याबाबत चौकशी करून दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कामास विलंब होण्यास मुक्ताईनगर क्रीडा अधिकारी हे या कामात पारंगत नसल्याने कामास विलंब झाला. त्यांना याबाबत लेखी समज देण्यात आल्याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...