आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:शेगाव, नांदुरा, मलकापूरला पाहणी‎

जळगाव‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या भुसावळ विभागातील ३५‎ रेल्वे स्थानकांवर अमृत भारत‎ योजनेंतर्गत नव्याने विकासकामे‎ केली जाणार आहे. यात संतनगरी‎ शेगाव, नांदुरा व मलकापूर या‎ स्थानकांचाही समावेश आहे. या‎ अनुषंगाने सोमवारी विभागीय रेल्वे‎ व्यवस्थापक एस.एस. केडिया,‎ गतिशक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प‎ व्यवस्थापक नवीन पाटील व इतर‎ अधिकाऱ्यांनी या स्थानकांची‎ पाहणी केली.‎ शेगाव स्थानकावर होमलॅँ‎ प्लेटफार्म, तिसऱ्या व चौथ्या‎ लाइनचे प्लॅनिंग, दुचाकी व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चारचाकी वाहनांची पार्किंग‎ व्यवस्था, पाथवे, स्थानकावरील‎ शेड, प्रतीक्षालय, आराम कक्ष,‎ पादचारी पूल, लिफ्ट, सरकता‎ जिना, गार्डन याची पाहणी व कशा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रकारे प्लानिंग असेल याबाबत‎ माहिती देण्यात आली.

नांदुरा‎ स्टेशनवर पार्किंग, ड्रॉप अॅण्ड गो‎ एरिया, लिफ्ट, पादचारी जिना, शेड‎ व इतर प्रवासी सुविधा तसेच‎ मलकापूर स्टेशनवर तिसरी आणि‎ चौथी लाइन, बुकिंग ऑफिस,‎ पार्किंग, येण्या - जाण्यासाठी‎ प्रवेशद्वार माल गोदामासाठी स्वतंत्र‎ रस्त्याचे नियोजन करण्यात आले.‎ इतर प्रवासी सुविधांवर चर्चा‎ करण्यात आली. या‎ निरीक्षणादरम्यान वरिष्ठ विभागीय‎ वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज‎ मानसपुरे, वरिष्ठ विभागीय विद्युत‎ अभियंता पालटा सिंग, वरिष्ठ‎ विभागीय सिग्नल व दूरसंचार‎ अभियंता विजय कांची, डेप्युटी‎ मुख्य अभियंता निर्माण पंकज‎ धावरे, विभागीय सुरक्षा आयुक्त‎ श्रीनिवास राव व मंडल अभियंता‎ शुक्ला आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...