आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:दूध संघ प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्याचे निर्देश

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघ प्रकरणात कार्यकारी संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे सरकार, गृह सचिव, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व तपास अधिकारी संदीप परदेशी यांना नोटीस बजावण्याचे निर्देशही दाखल असलेल्या रिट याचिकेनुसार दिले असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणात जेएमएफसी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर १४ नोव्हंेबर रोजी सुनावणी होणार आहे. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण व इतर चौदा जणांनी चुकीचे ठराव करून रहिवासी असल्याचे दाखवून दिशाभूल केली. याबाबत दाखल असलेल्या अर्जंट पिटिशनवर खंडपीठात १६ नोव्हंेबर रोजी सुनावणी होणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...