आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिवासी कोळी सेनेतर्फे रविवारी ऑटोनगरातील मंगलम लॉनमध्ये झालेल्या कोळी समाजातील विवाहेच्छुक वधू-वर परिचय मेळाव्यात ४८ युवक-युवतींनी परिचय करून दिला. त्यात ५ विवाह जुळण्याच्या मार्गावर असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील महिला पदाधिकारी व सदस्यांनी या संपूर्ण मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास विविध घटकातील महिला प्रमुख पाहुण्या होत्या. समाज पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
महापौर जयश्री महाजन, सामाजिक कार्यकर्त्या निशा पवार, टीव्ही स्टार रूपाली घायके-तायडे, आदिवासी काेळी सेनेच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा शारदा महाले, राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव कोळी, हिरामणी पुरिया, नगरसेविका नीता सोनवणे आदी उपस्थित होत्या.
आदिवासी कोळी समाजातील महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासह महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. कलावंत रूपाली घायके-तायडे यांनी योग्य जोडीदार निवडण्याविषयी मार्गदर्शन केलेे. केवळ नोकरदार जोडीदाराची अपेक्षा न करता, व्यावसायिक, शेतकरी अशा अनुरूप जोडीदाराचीही निवड करावी, असेही नमूद केले.
पदाधिकाऱ्यांचा केला सन्मान : मेळाव्यासाठी नोंदणीसह आयोजनाची जबाबदारीही महिलांनी पूर्ण केल्याने पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. उपाध्यक्षा शारदा महाले यांनी सेनेच्या विविध कार्याची माहिती दिली. समाजाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन येथे केले. व्यासपीठावर राजमाला सपकाळे, गणेश साळुंखे,संजय कोळी, सुनील कोळी आदी उपस्थित होते. रेखा धम्मरत्न यांनी सूत्रसंचालन केले. शोभा तायडे, अनिता सपकाळे, चारुशीला सोनवणे, रजनी तायडे यांनी नियोजन केले. सूत्रबद्ध नियाेजनाचे मान्यवरांनी काैतुक केले.
आयाेजनाचा आला अनुभव
मेळाव्याचे आयाेजन, नियाेजनाची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली हाेती. त्यातून वेळ, जनसंपर्क, संवादकाैशल्य या गाेष्टी शिकायला मिळाल्या अशी भावना आयाेजन समितीत सहभागी महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केली. आगामी काळात या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची ग्वाही आदिवासी काेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.