आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Introduction Of Purity Guarantee Stamps On Gold Jewelery In Jalgaon For The First Time In The Country 68 Years Ago; The First Jewelry Showroom |marathi News

दिव्य मराठी विशेष:68 वर्षांपूर्वी देशात प्रथमच जळगावमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर शुद्धता हमीच्या शिक्क्यांचा प्रारंभ; दागिन्यांचे पहिले शोरूमही

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धातू विशेषत: सोन्याच्या शुद्धतेची ओळख म्हणून ‘हॉलमार्क’ला जगात पहिल्यांदा स्वीकारले गेले ते १९७२ मध्ये. जळगाव शहराने मात्र १९५४ मध्येच सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारे चिन्ह दागिन्यांवर उमटवायला सुरूवात केली होती. म्हणूनच आजही सोन्याच्या शुद्धतेसाठी जळगावची संपूर्ण देशात ओळख आहे. सोन्याच्या दागिन्यांचेही शोरूमची संकल्पनाही जळगावनेच देशाला दिली. सोने शुद्ध करणारा प्रकल्प नसतानाही जळगावने लौकिक कसा कमावला, यावर आर.एल. ज्वेलर्सचे संचालक ईश्वरलाल जैन सांगतात की, १९५४ मध्ये राजमल जैन यांनी पहिल्यांदा हा प्रयोग केला.

त्यावेळी सोन्याची शुद्धता सहज तपासता येण्याची सोय नव्हती. अशा वेळी लोकांना विश्वास निर्माण व्हावा आणि आपल्याकडच्या सोन्याला ओळख मिळावी म्हणून जैन यांनी दागिन्यांवर खिळ्याच्या सहायाने आपल्या पेढीची अद्याक्षरे कोरायला सुरूवात केली. त्याला ‘मारका’ म्हणत असत. लवकरच ते चिन्ह विश्वासार्हतेचे प्रतिक बनले. पुढे ठसे बनवून ते सोन्यावर उमटवणे सुरू झाले.

शुद्धतेत फरक का?
सोने हा अत्यंत नरम धातू आहे. त्यामुळे ९९.९% शुद्ध सोन्यात दागिने बनवता येत नाहीत. त्यासाठी त्यात चांदी आणि तांबे हा धातू काही प्रमाणात मिळवला जातो. त्याचे प्रमाण अत्यल्प असणे हे जळगावच्या दागिने बनवणाऱ्या कारागिरांचे विशेष कौशल्य होते आणि ते आजही टिकून आहे. त्यामुळे इतर ठिकाणचा दागिना व जळगावातील दागिन्याच्या चकाकीत मोठा फरक असतो.

शोरूमची सुरुवातही इथेच
पूर्वी ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर पाहिजे तो दागिना बनवून देण्याची पद्धत होती. त्यामुळे सोन्यात फार गुंतवणूक करावी लागायची नाही. मात्र, राजमल जैन यांनी पहिल्यांदा जास्त सोन्याची गुंतवणूक करून कारागिरांकडून अधिकचे दागिने बनवून घ्यायला आणि ते शोकेसमध्ये मांडून ठेवायला सुरूवात केली. तिथूनच दागिन्यांची शोरूम करण्याची सुरूवात झाली.

विदेशातही मिळाली पावती
जळगाव सराफा असोसिएशनचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी सांगितले की, जळगावातील एक विवाहिता अमेरिकेत असताना एक दागिना विकायला तिथल्या सोने व्यापाऱ्याकडे गेली. २२ कॅरेटचा हा दागिना तिने जळगावातून एका पेढीतून घेतला होता. अमेरिकेतील दुकानात त्या सोन्याची शुद्धता तपासली गेली तेव्हा त्यात मानकापेक्षा अधिक प्रमाणात सोने अन् कमी प्रमाणात अन्य धातू असल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...