आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Investigate Those Who Jeopardize The Careers Of Leaders; Movement On Behalf Of BJP, Statement To District Collector|marathi News |jalgoan News

निवेदन:नेत्यांची कारकीर्द संकटात आणणाऱ्यांची चौकशी करा; भाजपतर्फे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री गिरीश महाजनांसह भाजपच्या अन्य नेत्यांची कारकीर्द संपुष्टात आणणाऱ्यांची सखोल चौकशी करावी, यासाठी भाजप महानगरतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वाशे तासांच्या व्हिडिओ फुटेजद्वारे या कारस्थानाचा गौप्यस्फोट केला. माजी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओद्वारे केलेल्या पुराव्यांद्वारे महाविकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करत आहे. आमदार गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मोक्का अंतर्गत अडकण्याचा कट महाविकास आघाडीचे सरकार करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, सरकारी वकील व आदेश देणारे राजकारणी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमाेने निवेदनातून केलीआहे. या वेळी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, सीमा भोळे, सुचिता हाडा, आकाश सपकाळे, धीरज सोनवणे उपस्थित होते.

प्रवीण चव्हाण यांचीही चौकशी करा : रिपाइं
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पुराव्यानुसार वकील प्रवीण चव्हाण यांनी भाजप नेत्यांना अडकवण्याचे प्लॅन केल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भरत मोरे, युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, किरण अडकमोल, संदीप तायडे, भीमराव सोनवणे, शुभम सदावर्ते, अविनाश पारधे, शरीफ शेख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...