आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:सोन्याच्या बिस्किटांत गुंतवणूक; अनेकांना गंडा

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्याच्या बिस्किटांमध्ये ट्रेडिंग करून चांगला परतावा मिळवण्याचे आमिष देत सायबर भामट्यांनी महावितरणचे अभियंता देवेंद्र मोतीराम सिडाम यांची ८ लाख ८५ हजार रुपयांत फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच संबंधित अॅपला एरर आला आहे. अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

एका अनोळखी व्यक्तीने सिडाम यांना डॉटगोल्ड नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले होते. त्यानुसार सिडाम यांनी सोन्याच्या बिस्किटांची ट्रेडिंग केली. यात त्यांना ९७ हजार रुपयांचा नफा झाला. नंतर मात्र जास्त नफा मिळवण्यासाठी कर भरण्याच्या अटी घालून त्यांनी गुंतवलेले ८ लाख ८५ हजार रुपयेदेखील परत दिले नाही. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला. दरम्यान, मंगळवारी प्लेस्टोअरवर हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर एरर पेज समोर येत होते. ‘कॅन नॉट फाइंड फाइल, क्लोज धीस विंडो’ असा संदेश समोर येत होता.

अशा प्रकारे फसवणूक केल्यानंतर भामटे संबंधित आयपी अॅड्रेस, अॅप्लिकेशन बंद करीत असल्याचेही सायबर पोलिसांनी सांगितले. सिडाम यांच्यासह अनेक लोकांची यात फसवणूक झाली आहे. अॅप्लिकेशनवर अनेकांनी नकारात्मक व त्यांना आलेल्या फसवणुकीच्या प्रतिक्रियादेखील नोंदवलेल्या आहेत. सिडाम यांनीदेखील नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. व्यवहार करण्यासाठी सुरुवातीला वापरले जाणारे मोबइल नंबर नंतर बंद होतात. त्यांना अॅप्लिकेशनच्या माध्यमातून विचारणा केली असता नेटवर्कच्या अडचणींचे कारण भामटे सांगतात. असा अनुभव सिडाम यांनी ‘दिव्य मराठी’सोबत शेअर केला.

बातम्या आणखी आहेत...