आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संभाव्य दरवाढीने गुंतवणूकदार वळले साेन्याकडे, जळगावात सरासरी दरराेज सात किलाेपर्यंत खरेदी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय जगतात युद्धाचे ढग पुन्हा गडद हाेण्याची शक्यता आहे. परिणामी साेने बाजाराला तेजी येते आहे. अर्थात, गुंतवणूकदारांनी आपला माेर्चा साेन्याकडे वळवला आहे. म्हणूनच सुवर्णनगरी जळगावात दरराेज सरासरी सात किलाे साेने खरेदी केले जाते आहे. त्यात पाच ताेळ्याची बिस्किटे, १०० ग्रॅम वजनाच्या चिपला पसंती आहे.

जळगावात शुक्रवारी २४ कॅरेट साेन्याचे दर प्रतिताेळा ५४ हजार ४०० रुपयांवर हाेता. गेल्या आठवड्यापासून दरात किंचित चढ-उतार सुरू आहे. मात्र, असे असले तरी हे भाव पुन्हा वाढून ६५ हजारांचा टप्पा पार करतील, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जाताे आहे. त्यामुळे सुवर्ण व्यापाराचा अभ्यास असलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांचा माेर्चा आता साेन्याकडे वळवल्याचे दिसते आहे.

सध्या लग्नसराई, समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे दागिने खरेदीही वाढली आहे. जे माेठे गुंतवणूकदार आहेत ते पाच ताेळ्याची साेन्याची बिस्किटे, १०० ग्रॅम वजनाची चीप, अर्धा किलाे चांदी यालाच अधिक पसंती देताहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सराफा बाजारात दरराेज सरासरी पाच ते सात किलाे साेने गुंतवणूकदार खरेदी करताहेत. म्हणजेच किमान पावणेचार काेटी रुपयांपर्यंतची आर्थिक उलाढाल त्यातून हाेते आहे.

चांदी दरात चढ-उतार
चांदीचे भाव १२ डिसेंबरला प्रतिकिलाे ६७ हजार रुपयांवर हाेते. शनिवारी मात्र, भाव ६६ हजार ८०० रुपयांवर आले. अर्थात, पाच दिवसांत २०० रुपयांनी भाव घसरले. मात्र, असे असले तरी चांदीचे भाव गेल्या आठवड्यात म्हणजेच ८ डिसेंबरला ६५ हजार रुपये किलाे हाेते. म्हणजेच आठवड्यात चांदी दाेन हजार रुपयांनी वाढली आहे.

सुरक्षित गुंतवणूक
आंतरराष्ट्रीय बाजारातील जाणकारांनी साेन्याच्या दरात वाढ हाेण्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवली. यापूर्वी ही खरेदी नगण्य हाेती. शहरातील सराफा बाजारात आज ती दिवसाला पाच ते सात किलाेपर्यंत आहे. -अजय ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ असाेसिएशन

बातम्या आणखी आहेत...