आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री महालक्ष्मींचे आवाहन:अनुराधा नक्षत्रात आज सकाळी 9 ते रात्री 9 करा श्री महालक्ष्मींचे आवाहन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर आता गृहिणींना वेध लागले आहेत ते श्री महालक्ष्मी (गौरी) आवाहनाचे. ३ सप्टेंबरपासून ज्येष्ठा गौरींचे आगमन होत आहे. शनिवारी अनुराधा नक्षत्रात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत गौरीचे आवाहन करता येणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत या सणाच्या खरेदीसाठीही नागरिकांची लगबग वाढली आहे. स्टील आणि लोखंडाचे भाव वाढल्याने यंदा कोठ्यांच्या किमती ४०० ते १५०० रुपयांपर्यंत पोहाेचल्या आहेत. महालक्ष्मीचे मुखवटे, मखर साज सात ते आठ हजारांपर्यंत खर्च येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुखवट्यांच्याही किमती यंदा वाढल्या असल्याची स्थिती आहे.

लोखंड व स्टीलचे दर वाढल्याने पीओपीच्या मुखवट्यांना मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विक्रेत्यांनी सुंदर मुखवटे विक्रीसाठी ठेवले आहे. बाजारात गौराईसाठी मुखवटे, कंबरपट्टा, बाजूबंद, नथ, कर्णफुले, माळा हे दागिने व आराससाठी विविध वस्तू उपलब्ध आहेत,

बातम्या आणखी आहेत...