आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक जीवनात समाजाचा घटक म्हणून जगत असताना स्त्रियांचा, वंचितांचा, उपेक्षितांचा आवाज होऊन जनतेच्या भाषेत जनतेच्या आवाज होऊन लिहिणारा हा खरा प्रतिभावंत असताे. समाजातला आवाज घेऊन एक स्त्री बोलते आहे, समाजाला संबोधते आहे, कानउघाडणी करते आहे, त्यावेळेस समाजा- समाजातली माणसं जागे होणे गरजेचं असतं. समाजाला विचारांची पालवी फुटणं ही वर्तमानाची गरज अाहे, असे मत ज्येष्ठ समीक्षक, तथा राज्याचे शासन व्यवहार कोश सुलभीकरण समिती अध्यक्ष केशव सखाराम देशमुख यांनी व्यक्त केले.
कवयित्री इंदिरा जाधव लिखित ‘पालवी’ कविता संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बाेलत हाेते. लिखाणाचा परिवार व्यापक झाला पाहिजे. धिक्कार करणारी कविता, दृष्ट प्रवृत्तीला ठोकरणारी कविता ‘पालवी’ कविता संग्रहात असून समंजस विद्रोहाचा आवाज या कवितासंग्रहात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्रा. ए. पी. चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर, डॉ. मिलिंद बागुल, प्राचार्य जयश्री नेमाडे, युवराज माळी, मजीद झकेरिया विचार मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. कवयित्री इंदिरा जाधव यांनी आपल्या पालवी कविता संग्रहाविषयी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य जयश्री नेमाडे, भगवान भटकर यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी किशोर नेवे लिखित ‘दिव्य ज्योत’ कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर यांनी केले. आभार राजेंद्र पारे यांनी मानले. कार्यक्रमास विजयकुमार मौर्य, शिवचरण उज्जैनकर, शिवराम शिरसाठ, डी. डी. पाटील, बापू पानपाटील, डॉ. सत्यजित साळवे, , गोविंद पाटील, राहुल निकम, शिरीष चौधरी, भय्यासाहेब देवरे व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सागर फाळके, रवींद्र फाळके, प्रशांत फडके, हेमांगिनी फाळके, नेहा फाळके, प्रवीणा जाधव, विद्याधर सोनवणे, माधुरी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
रूढीवाद, परंपरा माेडीत निघावा : प्रतिभा शिंदे महिलांचा आवाज हा निश्चितपणे समाजाचा भान जपणारा आणि दिशा देणारा असतो. सामाजिक विषमतेच्या असणाऱ्या वातावरणात स्त्रियांना मिळणारे स्थान परंपरा आणि रूढीवादी व्यवस्थेने दुय्यम ठेवलेले आहे. हा रूढीवाद आणि परंपरा या मोडीत काढत स्त्रियांनी स्त्रियांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आज येऊन ठेपली अाहे. इंदिरा जाधव यांच्या कवितातून हा बुलंद आवाज व्यक्त झाल्याचा अनुभव निश्चितपणे नवी ‘पालवी’ प्राप्त करून देईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.