आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला. असे असताना डांबरीकरणाच्या कामावर टाकलेल्या बारीक कचमुळे धूळ वाढली आहे. नागरिकांना हाेणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने रात्रीच्या वेळी काम करण्याचे धेारण ठरवायला हवे. यामुळे कामावरून वाहनेही धावणार नाहीत अन् व्यत्ययही येणार नाही.
शहरातील नवीन पिढीला प्रथमच शहरातील प्रमुख रस्ते चकचकीत हाेताना दिसत आहेत. गेल्या वीस वर्षांपासून शहरात रस्त्यांची कामे झाली नव्हती. खड्डे पडले की त्यावर तात्पुरती मलमपट्टी करून रस्ते आेबडधाेबड केले गेले; परंतु आता शासनाचा निधी तसेच महापालिका फंडातून शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. एमपीएम केल्यानंतर बीएमचे काम झाल्यावर मक्तेदारांकडून खडीचा बारीक कच टाकला जाताे आहे. यामागे रस्त्यावरील डांबर व खडी बाहेर निघू नये हा उद्देश आहे; परंतु बारीक कचमुळे रस्त्यांवर धुळीचे लाेट उठत आहेत. त्याचा फटका केवळ वाहनधारकांनाच नव्हे तर परिसरातील रहिवाशांना बसताे आहे. पीडब्ल्यूडीने नियाेजन करण्याची अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
माेठ्या शहरांप्रमाणे काम : राज्यासह देशभरात रात्रीच्या वेळी रस्त्यांची कामे केली जातात. माेठ्या शहरांत वाहतुकीचा प्रश्न निर्माण हाेत असल्याने प्रशासनाकडून मक्तेदाराला तशा सूचना दिल्या जातात. जळगावातही सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपाने आपल्या नियंत्रणातील मक्तेदारांकडून रात्रीच्या वेळी काम करून घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे. रात्री काम केल्यास वाहतुकीची समस्या नसेल. किमान १२ तास वाहने न चालल्यास रस्त्यांच्या कामालाही बाधा पाेहाेचणार नाही. पर्यायाने अवाजवी टाकली जाणारी बारीक कच अल्प प्रमाणात वापरात येईल. कचएेवजी चुन्याचा पर्याय निवडता येणार आहे.
पर्यायी मार्गाची आधीच घाेषणा करायला हवी पीडब्ल्यूडीने मनपाशी चर्चा करून समन्वयाने रात्रीच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जाते आहे. नियाेजन करून आधीच काेणता रस्ता रात्रीपासून दिवसा किती तास वाहतुकीसाठी बंद राहील हे जाहीर करावे. यासाेबतच वाहनधारकांनी काेणत्या रस्त्यांचा पर्यायी वापर करावा हे सुद्धा जाहीर करावे. जेणेकरून कामात अडथळा येणार नाही.
मक्तेदाराला सबब देण्याची संधी देऊ नका रस्त्यांची कामे करताना दिवसा वाहतुकीचा माेठा प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे दिवसभरात अनेकदा वाहतूक काेंडीचा सामना करावा लागताेय. यात प्रदूषणासाेबत वेळेचाही अपव्यय हाेताे आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी एकाच रस्त्याने जाण्याचा आग्रह न धरता पर्यायी रस्त्यांचा वापर केल्यास अडचणीतून मार्ग निघणे शक्य हाेईल. याशिवाय काम सुरू असलेल्या रस्त्यावरून तत्काळ वाहतूक केल्यास भविष्यात रस्ता खराब झाल्यास मक्तेदाराकडून वाहतुकीचे कारण दिले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.