आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:आयटीआय प्रवेश; ११ जागा अद्याप रिक्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय आयटीआयची प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शुक्रवारी (२ सप्टेंबर) समुपदेशनाची पहिली फेरी झाली. त्यात रिक्त असलेल्या १०४ जागांवर ९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. ११ जागा शिल्लक आहेत.

आयटीआयमध्ये वेगवेगळ्या २४ ट्रेडसाठी गेल्या महिनाभरापासून प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. चार फेऱ्या झाल्यानंतर १०४ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यासाठी समुपदेशनाच्या दोन फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या फेरीत ९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. उर्वरित ११ जागांसाठी विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटर देण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याने प्रवेश निश्चित होऊ शकले नाही. ५ सप्टेंबरपर्यंत संधी देण्यात आली आहे. यानंतरही जागा रिक्त राहिल्यास ६ ते १० सप्टेंबर दरम्यान समुपदेशनाची दुसरी फेरी सुरू होणार आहे. या फेरीनंतर आयटीआय प्रवेशप्रक्रिया थांबेल. तत्पूर्वी १ सप्टेंबरपासून सर्व २४ ट्रेडच्या नियमित अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...