आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश देण्यास सुरूवात:आयटीआय प्रवेश ; दिव्यांग विद्यार्थ्यांना आल्या अडचणी तीन ऑगस्टपर्यंत सुरू राहणार पहिली फेरी

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयटीआय प्रवेशासाठी २९ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली होती. त्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरूवात झाली. सोमवारी प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र नूतनीकरण करुन आणून देण्याची मागणी करण्यात आली.

त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थी, पालकांनी प्राचार्य, शिक्षकांची समजूत काढली. प्रमाणपत्र शासनानेच दिलेले असल्याचा युक्तीवाद केल्यानंतर प्रवेश प्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, पहिली प्रवेश फेरी तीन ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

१७१ विद्यार्थ्यांचे प्रवेश
आयटी आयच्या प्रवेशप्रकियेत साेमवारपर्यंत १७१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. तीन ऑगस्टनंतर गुणवत्ता यादीनुसार दुसऱ्या फेरीतील प्रवेशप्रकियेला सुरुवात केली जाणार आहे

बातम्या आणखी आहेत...