आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:देशात बेरोजगारीचा दर वाढत असताना जैन इरिगेशनने दिल्या 1060 नोकऱ्या

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात आणि राज्यातही बेरोजगारीचा दर वाढला असून देशभरातील १६ लाख नोकरदारांनी नोकरी गमावल्याचे सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमी (सीएमआयई) या संस्थेने जाहीर केले असले तरी जळगावमध्ये मात्र वेगळी स्थिती आहे. जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड या कंपनीने १०६० जणांना कोरोनाकाळात कायमस्वरूपी नोकरी दिली आहे. सध्या कंपनीच्या आस्थापनेवर ६२५० तर सुमारे ४५०० कामगार कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत.

कोरोना काळात बहुतांश उद्योग आणि व्यवसाय अडचणीत आले. लाॅकडाऊनमुळे उत्पादनांना बसलेली खीळ, मालवाहतुकीच्या अडचणी आणि एकूणच बाजारातील मागणीत झालेली प्रचंड घट यामुळे बहुतांश कंपन्यांना कर्मचारी कपात करावी लागली. सध्या देशाचे सकल उत्पादन (जीडीपी) वाढल्याचे आकडे समोर आले असले तरी आजही बेरोजगारी वाढत असल्याचेच चित्र आहे. एकट्या आॅगस्ट महिन्यात देशभरातील १६ लाख लोकांनी रोजगार गमावला आहे. देशातील अन्य देशांच्या तुलनेत महाराष्ट्राचा बेरोजगारीचा दर कमी असला तरी जैन इरिगेशन कंपनीने केलेली कामगिरी मात्र नोकरदारांना दिलासा देणारी ठरली आहे.

गरजू लोकांना चांगला रोजगार दिला यात आनंद
कर्मचारी आणि कामगारांच्याच बळावर कंपनी चालते हे आमच्या कंपनीचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे कोरोनाकाळात सर्वच कंपन्या अडचणीत असतानाही जैन इरिगेशनने हजाराहून अधिक लोकांना कायमस्वरूपी रोजगार दिला, याचा आनंद आहे. -अतुल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सि.लि.

बातम्या आणखी आहेत...