आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पिंडीवर जलाभिषेकाने सकारात्मक ऊर्जा तर बेलपत्र सेवनाने पाेटाचे विकार हाेतात कमी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री आशुताेष शिव महापुराण कथा निरुपण पंडित प्रदीप मिश्रा हे देशभरात करताहेत. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने नागरीक सकाळी व सायंकाळी महादेवाच्या पिंडीवर जलार्पण करून बेलपत्रांचे सेवनही करताहेत. धार्मिक भावनेने हे केले जात असले तरी ते आराेग्यासाठी फायदेशीर आहे.

पिंडीवर जलाभिषेक केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तर राेज बेलपत्र सेवनाने पाेटाचे विकार दूर हाेतात, असा दावा शहरातील आयुर्वेदतज्ज्ञांनी केला आहे.

लहान शिवमंदिरांची संख्या वाढतेय
पूर्वी मंदिरात जाऊन लोक महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करायचे. आता अनेक कॉलन्यांमध्ये लहान मंदिरे, महादेवाच्या पिंडी उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. घरापासून जवळच्या अंतरावर पिंड असावी यासाठी अनेक कॉलन्यांमध्ये उभारणी झाली आहे. हा श्रद्धेचा भाग असला तरी त्यामागचे आयुर्वेदीय कारणही महत्वाचे असल्याचे सांगण्यात येते.

मनातील इच्छा केल्या हाेताहेत पूर्ण
पिंडीवर पाणी अर्पण केल्याने सकारात्मक उर्जा मिळण्याची प्रचिती अनेकांना आली आहे. इच्छा पूर्ण करण्यासाठी हा धार्मिक उपाय आहे. बेलपत्रांचे सेवन केल्याने अनावश्यक गाठी विरघळतात.- भूषण जोशी, धुळेकर महाराज, जळगाव

बातम्या आणखी आहेत...