आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासनई चौघडा मंगलवाद्यासह मंगलाष्टकांच्या गजरात भगवान शंकर पार्वतीचा विवाह सोहळा बुधवारी द्वारकानगरात झाला. लग्न घटिका समीप येताच मंगलाष्टकांतील शुभमंगल सावधान हे पूर्ण होताच, देव देवतांसह भूत पिशाच्च, राक्षसांनी एक जल्लोष करीत नाच केला. यास उपस्थित भाविकांचीही जोड मिळाली. सूर्यकिरण फाऊंडेशन तर्फे आयोजित संगीतमय शिवमहापुराण कथेवेळी भाविकांनी सजीव आरास करीत शिवपार्वती विवाह सोहळ्याचा आनंद लुटला.
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव माता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगतातले भूत-प्रेत होते. याखेरीज शिवजींच्या मिरवणुकीत भुत, चुडैलसुद्धा सहभागी होते. यानुसार श्रीभोलेनाथ यांना भस्माने सुशोभित केले होते, हाडांची माळ घालण्यात आली. देवलोकामध्ये ही अनोख्या पद्धतीने शिवशंकरांचे लग्न लागले होते. याच पद्धतीने सप्ताहात शिवमहापुराण कथे अंतर्गत हा विवाह सोहळा भाविकांनी रंगविला.
कथाकार देवदत्त मोरदे यांनी माता पार्वती आणि भोलेनाथ यांचे लग्न सृष्टीचे निर्माते श्री ब्रह्माच्या उपस्थितीत झाले. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जात असल्याचे सांगत या देवलोकातील एक आगळ्या वेगळ्या विवाहाची कथा सांगितली. परिसरातील एक हजारावर भाविक यावेळी सहभागी झाले.
वेशभूषा साकारण्यास लागला वेळ
विनोद राणे हे शंकराच्या वेशभूषेत तर स्वाती राणे या पार्वती बनल्या. भूताची भूमिका सुहास पाटील, प्रदीप वाणी, प्रेम पाटील, नमिता राणे यांनी साकारली, तर नंदीच्या अवतारात अरूण महाराज अवतरले. दीपक सरोदे यांनी नारदाची उत्कृष्ट आरास केली. आरास सादर करण्यासाठी दुपार पासूनच कलाकारांची तयारी सुरु होती. यासाठी स्वतंत्र यंत्रणाच तयार करण्यात आली होती. यात बालकांसह महिला, वृद्धही उत्सफूर्तेपणे सहभागी झाले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत धांडे, उपाध्यक्ष सुहास पाटील, सचिव विजय पवार यांच्यासह जगदीश बोरोले, शैलेश जैस्वाल, विलास माळी, भास्कर राणे यांनी नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.