आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचा उपक्रम:जळगावमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्यांना RTPCR तपासणीचे प्रशिक्षण

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे विज्ञान शाखेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना कोरोना नमुना तपासणीचे अद्ययावत प्रशिक्षण तज्ञ डॉक्टरांनी दिले. यावेळी विद्यार्थ्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्ह्यात कोरोना महामारीची संभाव्य लाट येण्याबाबत तर्क लावले जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नमुना तपासणी करणाऱ्या कार्यक्षम व्यक्तींची गरज लक्षात घेता अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या संकल्पनेनुसार सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या वतीने प्रशिक्षण घेण्यात आले. शहरातील विज्ञान महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर या जैवतंत्रज्ञान विषयातील चाचणीची माहिती देण्यात आली. अत्यंत किचकट असलेले प्रशिक्षण मार्गदर्शकांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. यावेळी सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कैलास वाघ, सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिव्या शेकोकार, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. गौरांग चौधरी यांनी प्रशिक्षण दिले. कार्यशाळा समन्वयक डॉ. सागर पाटील, डॉ. राजेश्वरी खंडागळे यांच्यासह मु. जे. महाविद्यालयाचे सहकार्य केले.

काळजी घेण्याचे मार्गदर्शन

प्रशिक्षणामध्ये आरटीपीसीआरची प्राथमिक माहिती, नमुना कसा घ्यावा, त्याला तपासणीसाठी कसे पाठवावे याबाबत प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. प्रशिक्षणार्थीनी स्वतः टेस्टिंग करून चाचणी करताना घ्यायची काळजी, स्वतः संसर्ग होऊ नये यासाठी घ्यायची दक्षता याबाबत जाणून घेतले. प्रशिक्षणानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना सदिच्छा देऊन प्रमाणपत्र दिले. भविष्यात कोरोना महामारी आल्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही प्रशिक्षणार्थीनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...