आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट इंडिया हॅकथॉनमध्ये जळगाव प्रथम:जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशातून मारली बाजी

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ स्पर्धेत जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला.

ऑल इंडिया कोंसील फॉर टेक्निकल एज्युकेशनतर्फे नुकतीच ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन-2022’ ही राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत खान्देशातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती.

भारताचा 75 वा अमृत महोत्सवानिमित्ताने संपूर्ण भारतात 75 नोडल सेंटरवर प्राथमिक फेरीत पात्र झालेल्या विध्यार्थ्यांना याठिकाणी बोलवण्यात आले होते त्यातील केरळ व इंदोर या नोडल सेंटरवर जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला या उपक्रमासाठी प्रा. स्वाती पाटील, प्रा. डॉ. शंतनू पवार, प्रा.सौरभ नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

राखेपासून बनवल्या क्युब

ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे दिलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट नुसार, हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला कमी करण्यासाठी व्हाईट कोल अ‍ॅश जिओपोलिमर काँक्रिट हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे काँक्रिट सिमेंट आणि पाण्याशिवाय बनू शकते, तसेच त्यामध्ये विद्यार्थ्यांनी एक ग्राफिकल इंटरफेस दिला त्यामध्ये कुठलेही बांधकाम क्षेत्रातील पावडर प्रकारातील मटेरियलचे कार्बन इमिशन काढू शकतो.

तसेच कुठलाही प्रकारच्या जिओपोलीमर काँक्रिटचे एका क्लिक वर मिक्स डिझाईन मिळू शकते. जिओपोलीमर काँक्रिटसाठी एक विशिष्ट असा मापदंड सध्या नाही. या मुळे बांधकाम शेत्रातील व्यक्तींना हे फायदेशीर ठरेल. या संपूर्ण प्रकल्पावर विद्यार्थ्यांनी ३६ तास अखंड काम केले.

संगणक अभियांत्रिकीचा प्रकल्प

संगणक अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांनी ‘सर्च इंजिन फोर वेदाज रिलेटेड टेक्स्ट वर्ड’ या विषयावर प्रकल्प सादर केला होता. हे एक शब्द शोध इंजिन आहे. भारतीय वेदांमध्ये असंख्य शब्दांचा समूह आहे. त्या शब्द समूहाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय नॉलेज विभागातर्फे विद्यार्थ्यांना हे सर्च इंजिन बनवायचे होते. ज्यांना लिहिता येत नाही ते लोक हा शब्द उच्चारून सुध्दा त्या शब्दाचा मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये त्यांना समजतो. आपण ऑडिओ द्वारे देखील ऐकू शकतो.

तसेच दिलेला शब्द हा कोणत्या वेदांमधील कोणत्या खंडात आणि कोणत्या श्लोकात येतो त्या श्लोकाचा क्रमांक कोणता हे शोधता येते. अशा प्रकारे वेदांचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन केले आहे. प्रकल्पासाठी ऐश्वर्या लुणावत, वरद साखरे, माधुरी घुगे, मोनिका महाजन, यश सोनार, दिव्या सुरवाडे या विद्यार्थ्यांनी काम केले.

बातम्या आणखी आहेत...