आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात महावितरणचे 8 लाख ग्राहक:56 हजार ग्राहकांच्या मीटरची तपासणी; 45 हजार 517 ग्राहकांचे मीटर फॉल्टी

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणतर्फे जिल्ह्यात फॉल्टी मीटरची तपासणी करण्यात येत आहे. यात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक असे एकूण 8 लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांपैकी महावितरणतर्फे जिल्ह्यातील 56 हजार 432 ग्राहकांकडील फॉल्टी मीटरची तपासणी करण्यात आली. यात 45 हजार 432 ग्राहकांकडील मीटर फॉल्टी आली. ग्राहकांकडील मीटर तांत्रिक कारणाने फॉल्टी झाले की ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करताना फॉल्टी झाले याची तपासणी मोहीम महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

ग्राहकाने महाविवतरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर या ग्राहकाकडे डिजिटल स्वरुपाचे वीजमीटर बसवण्यात येत आहे. तसेच ज्या ग्राहकांकडे जुने मीटर बसवले असेल अशा ग्राहकांकडेदेखील डिजिटल मीटर बसवण्यास येत आहे. या नवीन मीटरमध्ये वेळ, वार, वीज वापरानुसार झालेल्या रिडिंगचे आकडे, आतापर्यंत वापरलेला वीजपुरवठा, लोड किती आदी प्रकारची माहिती या मीटरवरून सामजते. मात्र, या डिजिटल मीटरचा डिस्प्ले जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असून तांत्रिक कारणाने मीटरचे आकडेही दिसत नसल्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारचा मीटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ग्राहकांना महावितरणतर्फे सरासरी वीजबिल देण्यात येत आहे. मात्र, ग्राहकाने मागणी केल्यास असे फॉल्टी मीटर बदलवून देण्यात येत आहे.

शहरातही कारवाई ...

शहरात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक मिळून 1 लाख 10 हजार ग्राहक आहेत. फॉल्टी मीटरच्या शोधासाठी महावितरणकडून संबंधित ग्राहकांच्या घरी जाऊन शोध मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत साडेचार हजार ग्राहकांकडे फॉल्टी मीटर आढळून आले आहे. या शोधमोहिमेत मीटरमध्ये फेरफार करताना मीटर फॉल्टी झाले आहे का? याचा शोध घेतला जातो. तसे अढळून आल्यास त्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जाते; अन्यथा सरासरी वीजबिल आकारले जाते.

फॉल्टी मीटर असणाऱ्यांना सरासरी बिल

महावितरण प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के म्हणाले की, वीज ग्राहकाकडील फॉल्टी मीटरची तपासणी संबंधित ग्राहकाच्या घरी जाऊन करण्यात येत आहे. संबंधित ग्राहकाच्या हेराफेरीमुळे मीटर फॉल्टी झाले असेल तर त्या ग्राहकाकडून आतापर्यंत वीज वापर काढून वीजबिल वसुलीसह दंडात्मक कारवाई केली जाते. दोशी नसल्यास त्यांना सरासरी वीजबिल आकारले जाते.

बातम्या आणखी आहेत...