आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:क्वारंटाइन करण्यात आलेल्या गर्भवती महिलेने दिला गोंडस कन्येला जन्म, कुटुंबात आनंदाचे वातावरण

पिंपळनेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्म झालेल्या मुलीचे केले 'अरुणा' असे नामकरण

विशाल बेनुस्कर

लॉकडाऊनमधे गेल्या 18 दिवसांपासून क्वारंटाइन असलेल्या एका गर्भवती महिलेने शुक्रवारी पहाटे एका कन्येला जन्म दिला, त्यामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 30 मार्च रोजी सुरत येथून यवतमाळ जिल्ह्यातील मोहा येथे जाण्यासाठी 15 लोकांचे कुटुंब मोठी पायपीट करून निघाले होते मात्र पिंपळनेर पोलिसांनी त्यांना गावातच अटकाव केल्याने सर्वांना प्रशासनाच्या आदेशानुसार पिंपळनेर येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. यात एक गर्भवती महिलेचा समावेश होता.

क्वारंटाइनमध्ये परिवाराला गर्भवती महिलेची चिंता होती. अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी सदर महिलेला धीर दिला व सर्व काळजी प्रशासन घेईल असे आश्वस्त केल्यानंतर महिलेची चिंता दूर झाली. सदर महिलेची तपासणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राकेश मोहने करीत होते.

सुरतमध्ये कामाला असणारे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मोहा 15 सदस्यांचे हे कुटुंब असून त्यात चार महिला, आठ पुरुष व तीन बालकांचा समावेश आहे. मात्र कामधंदे बंद झाले होते. तर  संपूर्ण लॉकडाऊन झाल्यामुळे येथे राहून काय करावे असा प्रश्न या कुटुंबियांना पडला होता. घरी जाण्याची मनात धडपड होती. मोठी पायपीट करून गावाकडे जाण्याच्या बेतात असतांनाच त्यांना प्रशासनाच्या आदेशानुसार आहे त्याच जागी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्वांची राहण्याची व्यवस्था येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात करण्यात आलेली आहे. सदर महिलेला शुक्रवारी पहाटे प्रसववेदना होऊ लागल्याने त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी या महिलेने पहाटे 5 वाजून 45 मिटांनी एका कन्येला जन्म दिलेला आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विश्व रुहानी मानव केंद्र व भोजन मंडळाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून महिलेला पोषण आहार दिला जात आहे, मातेने कन्येला जन्म दिल्यानंतर सर्वांनी आनंद व्यक्त केला. तहसीलदार विनायक थविल यांनी सदर जन्म देणारी माता, व मुलीची ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेतली व वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. 

प्रशासनाच्यावतीने मंडलाधिकारी आर. एस.पवार सदर महिलेची काळजी घेतली जात आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश मोहने यांनी सांगितले की महिलेची सामान्य प्रसुती करण्यात आली. बाळ निरोगी असुन वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश भामरे, डॉ. विवेक नुक्ते व त्यांच्या सहकार्यानी ही प्रसुती केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अरुणा असे केले मुलीचे नामकरण 

आता परिवारात एका चिमुकलीचे स्वागत झाल्यामुळे कोरोनाची भीती दूर होऊन आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. लॉकडाऊन कधी संपेल आणि घरी कधी जाऊ या प्रतिक्षेत आम्ही आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलगी झाल्यामुळे आम्ही मुलीचे नाव आम्ही सर्वांनी मिळून 'अरूणा' असे ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...