आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलटा फेरा:शेती खर्च 3 वर्षांत 60% वाढला; हमीभाव मात्र 10 टक्केच वाढले, शेतीचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी 3 वर्षांत निम्मे

जळगाव (प्रदीप राजपूत)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हमीभाव हा उत्पादन खर्चावर अाधारित असला पाहिजे हे मूळ परिमाण असले तरी प्रत्यक्षात दाेघांचा ताळमेळ नाही.

गेल्या तीन वर्षांत मजुरीसह बियाणे आणि खतेही महागल्यामुळे शेतातला खर्च सरासरी ६० टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे याच काळात शेतमालाच्या हमीभावातील वाढ मात्र १० टक्क्यांचीही वृद्धी नोंदवू शकलेली नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी तीन वर्षांत ते निम्मे झाले आहे हेच वास्तव आहे.

शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांसह बियाणे आणि अन्य वस्तूंच्या किमतीत गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढ नोंदवली जाते आहे. यंदा तर दरवाढीने उच्चांक गाठला आहे. रासायनिक खतांच्या ५० किलोच्या पिशवीची किंमत जवळपास ६१ टक्क्यांनी वाढली आहे. ठिबक सिंचनाचे साहित्य तर ६९ टक्क्यांनी वाढले आहे. पीव्हीसी पाइपच्या किंमती ६७.५ टक्क्यांनी वाढल्या. ट्रॅक्टरची नांगरटी, राेटाव्हेटर ५० टक्क्यांनी, तर सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मजुरीमध्ये ७५ टक्के वाढ झाली आहे. बियाणे, कीटकनाशके, मळणी या बाबींची वार्षिक १० टक्क्यापर्यंतची वाढ ही ठरलेलीच असते. दुसरीकडे शेतीवरील नैसर्गिक मालिकेचे दुष्टचक्र सुरू असल्याने उत्पादनात माेठी घट झाली आहे. शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादन ७० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे.

अायात-निर्यात धाेरण मुळावर
हमीभाव हा उत्पादन खर्चावर अाधारित असला पाहिजे हे मूळ परिमाण असले तरी प्रत्यक्षात दाेघांचा ताळमेळ नाही. इंधन दरवाढ ही काेणत्याही महागाईचे मूळ उगमस्थान असले तरी शासनाकडून मात्र महागाई वाढली की शेतमालाच्या अायात-निर्यात धाेरणात लवचिकता अाणली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची जागतिक बाजारातील अाशेची कवाडेच बंद हाेत अाहेत. एेन तेजीमध्ये कापूस, कांदा, डाळ निर्यातीवर नियंत्रण अाणल्याने बाजारपेठेत या पिकांचे भाव पडतात. नुकतीच कडधान्यांच्या अायातीला परवानगी दिल्याने देशांतर्गत तुरीसह अन्य डाळींचे दर घसरण्याची स्थिती निर्माण झाली अाहे. वाढत्या उत्पादन खर्चासह साेयीचे अायात-निर्यात धाेरण शेतकऱ्यांपुढची मूळ अडचण असल्याचे चित्र अाहे. साेबतच कृषी वीजपंपाचे वार्षिक अाकडेही वाढले अाहेत. शेतकऱ्यांना विनावापरही मीटरएेवजी वीजपंपाला अश्वशक्तीप्रमाणे वार्षिक १५ हजारांपासून ५० हजारांप्रमाणे बिले येत अाहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात अनपेक्षित मोठी वाढ झाली अाहे.

हमीभावांमध्ये किरकाेळ वाढ
२०१८ ते २०२१ या काळात पिकांच्या हमीभावांमध्ये मात्र किरकाेळ वाढ करण्यात आली आहे. कापसाचा भाव अवघा सात टक्के वाढला आहे. मका आठ टक्के, साेयाबीन १४.१५ टक्के, ज्वारी ७.८१ टक्के, बाजरी १०.२५ टक्के, मूग २.०२ टक्क,े तर भुईमुगाच्या हमीभावात ७.८७ टक्के वाढ करण्यात आली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही वाढ अत्यंत किरकाेळ आहे. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न दुप्पट होणे तर दूरची गोष्ट आहे, आता ते जवळपास निम्मे झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...