आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरातील २३ देश, व देशातील ६५ जिल्हे व जिल्ह्यातील २५०० स्पर्धकांचा सहभाग असलेल्या अहिंसा दौडची रविवारी ग्रिनीज बुक ऑफ रेका़ॅर्ड मध्ये नोंद करण्यात आली. जैन समाजबांधवांच्या जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन (जितो) या संघटनेतर्फे देशभरात एकाच वेळी ही दौड झाली.
शहरातील खानदेश सेंट्रल पासून सुुरू झालेल्या या दौड मधून सहभागींनी जागतिक शांतता कायम ठेवावी व अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा हा संदेश दिला. शहरात पहाटे साडेपाच वाजेपासून सुरु झालेल्या या उत्सवामुळे भगवान महावीर जयंती निमित्त आयोजित जन्मकल्याणक महोत्सवात चैतन्य निर्माण केले.
सकल जैन श्रीसंघातर्फे यानिमित्त पाच दिवसीय विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी झालेल्या दौडेत जैन समाजासह विविध समाजातील सुमारे ४००पेक्षा अधिक नागरिक यात सहभागी झाल्याने ही दौड सर्वसमावेशक झाल्याचे आयोजकांनी सांगितले. पहाटे ५.३० वाजता माजीमंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलिस अधिक्षक एम.जयकुमार, प्रीतम रायसोनी, समितीचे अध्यक्ष विनोद ठोळे, दिलीप गांधी, अजय ललवानी, नयनतारा बाफना, मनिष जैन, निता जैन यंाच्या हस्ते दौडला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
अशी झाली दौड
सहभागींसाठी दहा किलोमीटर, ५ किलोमीटर व ३ किलोमीटर अंतरासाठी ही दौड होती. पहिली दौड ५.३० वाजता, दुसरी दौड ६.३० व तिसरी दौड ७ वाजता निघाली. सहभागीना टीशर्ट व एनर्जी ड्रींकचे कीट देण्यात आले. या दौड दरम्यान ठिकठिकाणी सहभागींचे स्वागत करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात युवती व महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग दिसून आला. खानदेश सेंट्रल पासून सुरु झालेल्या दौडचा नवजीवन सुपर शॉप मार्गे बहिणाबाई उद्यानात समारोप झाला.
हे ठरले दौडचे विजेते
आज दुचाकी फेरी
सकाळी ६.३० वाजता स्वाध्याय महिला मंडळ व सुशिल बहुउद्देशिय मंडळातर्फे जिल्हा रुग्णालयात फळवाटप. सकाळी ७ वाजता आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात सामुहीक सामायिक. युवाचार्य गृप तर्फे सकाळी ८.३० वाजता खानेदश सेंट्रल पासून टू व्हीलर रॅली. सायंकाळी ७.३० वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृहात बक्षीस वितरणासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.