आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:मंगला सोनवणे, फिरोज पिंजारींनी अधीक्षिकांकडे तक्रारही केली नाही : फारुख शेख यांचा जबाब

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गैरप्रकार घडलाच नसल्याचा वसतिगृहात दाखल युवतीचे म्हणणे

आशादीप वसतिगृहात असलेल्या युवतीला भेटण्यासाठी गेलो असताना व्हिडिओ व तक्रारीबाबत फिरोज पिंजारी व मंगला सोनवणे यांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकांकडे तक्रार केली नाही. १.३० वाजता तेथील मुलीने आरडाओरड करीत तक्रार केली. त्यावेळी ते काही बोलले नाही. मात्र, त्यांच्यासोबतच्या साहील पठाण या युवकाने तो व्हिडिओ व्हायरल केल्याबाबत वसतिगृहाच्या रंजना झोपे यांनी विचारणा केली. त्याचप्रमाणे त्या युवतीने पोलिस व इतर पुरुषांबाबत गैरकृत्याचा प्रकार झाल्याच्या घटनेला नकार दिल्याचा जबाब फारुख शेख यांनी स्वत:हून चौकशी समितीला दिला आहे.

इतर पदाधिकाऱ्यांसह त्या युवतीच्या आईसह वसतिगृहात गेलो होतो. त्या युवती निरक्षर असल्याने फारुख यांनी त्यांच्या हस्ताक्षरात अर्ज दिला. त्यावर जिया बागवान, फिरोज पिंजारी व इतरांच्या सह्या आहेत. २ ते ३.३० वाजेच्या सुमारास मंगला सोनवणे, फिरोज पिंजारी हे तेथे असताना त्यांनी झोपे यांच्याकडे काही तक्रार केली नाही. कुण्या मुलीने आरडाओरड करीत तक्रार केली, असे काहीच बोलले नाही. साहिल पठाण या युवकाला वसतिगृहाच्या झोपे यांनी त्या मुलीचा व्हिडिओ तयार केल्याबाबत विचारणा केली. त्याला तो व्हिडिओ डिलिट करायलाही सांगितला होता. पिंजारी यांनी त्याच्या मोबाइलमधील तो व्हिडिओ डिलिट केला. त्यानंतर त्या युवतीला आई व भावाच्या ताब्यात देण्यात आले. तेथून बाहेर निघाल्यानंतर फारुख काद्री, जननायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी, फरीद खान, राणी शेख, वर्षा सुतार व इतर उभे होते. घरी जात असताना निवेदिता ताठे यांनी फोन करुन त्या मुलाने व्हिडिओ व्हायरल केल्याचे सांगितले. ३ मार्च रोजी त्या युवतीला वृत्तवाहिन्यांवर आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने विचारणा केली. वसतिगृहात तशी घटनाच घडली नसल्याचे तिने सांगितले. त्या मुलीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचेही तिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...