आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानसिक आनंद मिळवण्यासाठी निसर्गाचा सहवास अत्यंत उपयोगी मानला जातो. याच विचारातून श्रीराम स्टेट बँकेतील रहिवासी विलास जैन यांनी दोन वर्षांपूर्वी घरासमोरील महापालिकेच्या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीचे जबाबदारी घेतली. श्यामची आई नावाच्या या उद्यानास आता पक्षांचे अभयारण्य म्हणून ओळखले जातेय.
जैन यांनी स्वखर्चाने वृक्षारोपणासह पक्षांच्या अधिवासासाठी लागणारे आवश्यक ते साहित्य उद्यानात बसवले आहे. २३ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे हे उद्यान आहे.
पालिकेशी केला करार
अमृत योजनेंतर्गत महापालिकेने उद्यानात सुशोभीकरण सुरू केले होते. परंतु, देखभाल करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे दुर्लक्ष झाले. अशात उद्यानाच्या समोर राहणाऱ्या जैन यांनी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेतली. त्यासाठी महापालिकेने त्यांच्याकडून एक करार करून घेतला आहे. या करारांतर्गत उद्यानाचा मालकी हक्क पालिकेकडेच असणार आहे. तर सुशोभीकरण, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जैन यांनी घेतली आहे, अशी माहिती पालिकेच्या अभियंत्यांनी दिली.
असे झालेत बदल
जैन यांना उद्यानात पक्षांचा अधिवास वाढवायचा होता. त्या अनुशंगाने त्यांनी कदंबासह विशिष्ठ फळे असणारी झाडे लावली. झाडांवर पक्षांना बसण्यासाठी कृत्रिम घरटे लावली. दाणा-पाणी देण्याचे भांडे बसवले आहे. या कारणांमुळे आता उद्यानात शेकडो पक्षांचा चिवचिवाट दिवसभर राहतो.
तुम्हीही हे करू शकता
रहिवासी भागांमध्ये नागरीकांसाठी खुले भुखंड, उद्यान असतात. अनेक ठिकाणी महापालिका त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. अशा वेळी कॉलनी परिसरातील नोंदणीकृत संस्था ठराव करून किंवा वैयक्तीक कोणीही महापालिकेकडे उद्यान किंवा भुखंडाच्या देखभाल, दुरूस्ती, विकासासाठी मागणी करु शकतात. कायदेशीर प्रक्रिया करुन ते मिळवता येते. यात मूळ उद्यान, भुखंडाची मालकी पालिकेकडेच राहते. विकास कामांसाठी जबाबदारी घेतलेले नागरिक, संस्था विकास करतात. उद्यान, भूखंड ज्या ले आऊटमधील आहे, त्यातीलच रहिवासी नागरिक किंवा संस्थेला दिले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.