आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेव्हा भाजपवाले कोणत्या बिळात लपले होते ?:राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल; राज्यपाल, मंत्री पाटील, लाडांच्या प्रतिमेला मारले जोडे

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली,तेव्हा भाजपवाले कोणत्या बिळात लपले होते? त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्याची धमक भाजपात आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या टॉवर चौकात मंगळवारी दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड व भाजप प्रवक्ते सुशांधू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना जोडेमार करण्यात आले.

अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले होते. त्या निषेधार्थ सोमवारी भाजपतर्फे टॉवर चौकात पवार यांच्या प्रतिमेला जोडेमार करत घोषणाबाजी करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली.

मंगळवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, नामदेव चौधरी, मंगला पाटील, संजय पवार, वाल्मीक पाटील, अरविंद मानकरी, महिला आघाडी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विरोधी पक्षेनेते अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी

होय छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षकच होते, असा फलक घेऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांसह भाजप नेत्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीकडून जोडेमार करण्यात आली. राज्यपाल कोश्यारी हटाव, महाराष्ट्र बचाव तसेच भाजप नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून टॉवर चौकात रास्तारोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. भाजप नेते महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये करीत होते.त्यावेळी भाजपवाले कोणत्या बिळात लपले होते,असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...