आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक, चेअरमन पदावर नसताना देखील खोटे शिक्के, प्रोसेडींग बुक तयार करुन कारभारात हस्तक्षेप केला. या माध्यमातून लाखो रुपयांचा अपहार केला अशा आशयाची फिर्याद नीलेश भोईटे यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्या विरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 1998 ते 2002 या कालावधीत अॅड. पाटील व साळुंखे यांनी बनावट कागदपत्र तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मविप्र संस्था त्या काळात तानाजी भोईटे यांच्या ताब्यात होती. यावेळी अॅड. पाटील व साळुंखे यांनी संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र, शिक्के तयार केले. शहाजी त्र्यंबक साळुंखे यांना चेअरमनपदी दाखवले. २८ डिसेंबर १९९७ रोजी निवडणूकीसाठी सभा घेऊन खोटे प्रोसेडींग बुक तयार केले. या सभेत 22 संचालकांची निवड झाले, असे खोटे दस्ताऐवज तयार केले. त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे वेळोवेळी पाठवलेले चेंज रिपोर्ट देखील फेटाळण्यात आले आहे. या माध्यमातून अॅड. पाटील व साळुंखे यांनी संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करुन लाखाे रुपयांचा अपहार केला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय दबावापाेटी गुन्हा, न्यायालयात खटला प्रलंबित
अॅड. विजय पाटील म्हणाले की,आमचे चेंज रिपोर्ट फेटाळल्याप्रकरणी 2018 मध्ये उच्च न्यायालयात फर्स्ट अपील दाखल केले आहे. ते अद्याप पेडींग आहे. तत्पूूर्वीच मंत्री गिरीष महाजन यांच्या दबावाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आशयाची फिर्याद सन 2018 मध्ये पी. एस. पाटील यांनी दिली होती. त्या गुन्ह्यात कोणतेही तथ्य न आढळल्याने पोलिसांनी त्याला ‘सी समरी’ म्हणून निकाली काढले.
आधीपासून पाठपुरावा केला, आता फिर्याद दिली
नीलेश भोईटे म्हणाले की,फिर्यादीमधील दोन्ही संशयितांनी सुमारे 25 वर्षांपूर्वी संस्थेची फसवणूक, अपहार केला आहे. या संदर्भात जळगाव व नाशिकच्या धर्मदाय आयुक्तांनी त्यांचे चेंज रिपोर्ट फेटाळले आहे. सन 2018 पासून आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करीत होता. चार दिवसांपूर्वी फिर्याद दिली, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.