आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वस्तुस्थिती:नागरिकांच्या हक्काचा रस्ता‎ दुकानदार, हाॅकर्सने गिळला‎; रस्त्यावरच मंडप टाकून व्यवसाय, दिवसभरात हाेते सतत वाहतूक काेंडी

जळगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वाधिक वर्दळ अन् गर्दीचे‎ ठिकाण अशी नवीन अाेळख काेर्ट‎ चाैक ते चित्रा चाैक रस्त्याची झाली‎ अाहे. नागरिकांच्या हक्काच्या ५००‎ मीटर लांबीच्या मार्गावर प्रत्येक अकरा‎ मीटरवर हाॅकर्सने कब्जा केला अाहे.‎

याशिवाय रस्ता म्हणजेच पार्किंग अशा‎ अाविर्भावात ६६ पेक्षा जास्त चारचाकी‎ रस्ता अडवून उभ्या राहतात. हे कमी‎ की काय म्हणून दुकानदारांनी थेट‎ रस्त्यावरच हक्क बजावल्याने‎ वाहतुकीसाठी १५ पैकी ७ मीटर रुंदीचा‎ रस्ता मिळत अाहे. हे सर्व‎ महापालिकेच्या मर्जीनेच सुरू असून,‎ महापालिका प्रशासनाला भाडे मिळते‎ की काय? असा सवाल त्रस्त‎ वाहनधारकांकडून उपस्थित हाेत अाहे.‎

काेर्ट चाैक ते चित्रा चाैकादरम्यान गाेलाणी मार्केटजवळ हाॅकर्सने रस्ता व्यापल्याने झालेली वाहतूक काेंडी.‎ फळ विक्रेत्यांना सर्व काही अाहे माफ‎ या रस्त्यावर दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमाेर फलक‎ लावून, साहित्य ठेवले अाहेत; परंतु फळ विक्रेत्यांनी तर‎ थेट रस्त्यावरच हातगाड्या उभ्या करून पालिका व‎ पाेलिस प्रशासनाला अाव्हान दिले अाहे. ही परिस्थिती‎ ५०० मीटर लांबीच्या रस्त्यावर प्रत्येक ११ मीटर अंतरावर‎ पाहायला मिळते. दाेन्ही बाजूने रस्ता व्यापल्याने‎ वाहतुकीसाठी केवळ सात मीटर रुंदीचा रस्ता मिळताे.‎

जळगाव शहर हे व्यापारी संकुलांचे शहर अशी अाेळख‎ काही वर्षांपूर्वी झाली हाेती. त्यामागे तत्कालीन‎ सत्ताधाऱ्यांचे नियाेजन हाेते; परंतु अाता हाॅकर्सचे शहर‎ अशी नवीन अाेळख निर्माण झाली असून, त्यालाही‎ विद्यमान सत्ताधारी अाणि प्रशासनाचा कारभार‎ कारणीभूत ठरत अाहे. फळ विक्रेत्याला रस्त्यावर मंडप‎ टाकायचा झाल्यास महापालिकेच्या किरकाेळ वसुली‎ विभागाची परवानगी घ्यावी लागते.

त्यासाठी ५० पैसे‎ चाैरस फुटाप्रमाणे फी अदा करावी लागते; परंतु काही‎ दिवसांपासून गाेलाणी मार्केट रस्त्यावर फळ विक्रेत्याने‎ माेठा मंडप टाकून व्यवसाय सुरू केला अाहे. मुख्यमंत्री‎ दाैऱ्याच्या निमित्ताने पाेलिसांनी ताे काढला ; परंतु पुन्हा‎ असला मंडप उभारला जाणार नाही याची खात्री नाही.‎

अतिक्रमण विभाग नावालाच

फुले मार्केटमध्ये‎ तक्रारी झाल्यानंतर काही दिवस कारवाईचा देखावा‎ करण्यात अाला. अाता प्रत्येक रस्त्यावर हाॅकर्सचे‎ अतिक्रमण वाढले अाहे; परंतु अतिक्रमण विभाग तक्रार‎ केल्याशिवाय कारवाई करत नाही अशी स्थिती अाहे.‎ वर्षभरापासून अतिक्रमण विभागाचे अधिकारीही‎ मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगत अंग झटकत अाहेत.‎

‘दिव्य मराठी’ चमूने दुपारी केली पाहणी‎ ‘दिव्य मराठी’च्या चमूने बुधवारी दुपारी १ वाजता‎ पाहणी केली त्यावेळी चित्रा चाैकाकडून काेर्ट‎ चाैकाकडे जाताना २४ हातगाड्या उभ्या हाेत्या. काेर्ट‎ चाैकाकडून चित्रा चाैकाकडे जाणाऱ्या बाजूने १८‎ हातगाड्या हाेत्या; पण हेच चित्र सकाळी ९ ते १२ व‎ दुपारी ४ ते ८ वाजेदरम्यान वाढलेले असते. या वेळेत‎ वाहतुकीची काेंडी ही ठरलेली अाहे.‎

शहरातील प्रचंड वर्दळीचा काेर्ट‎ चाैक ते चित्रा चाैक हा ५००‎ मीटर लांबीचा रस्ता अाहे. या‎ मार्गावर बाेटावर माेजण्या एवढे‎ निवासस्थान असून, उर्वरित‎ सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने‎ अाहेत. गाेलाणी मार्केटही याच‎ मार्गावरील प्रमुख ठिकाण अाहे.‎ त्यामुळे संपूर्ण शहरातून‎ खरेदीसाठी अथवा कामानिमित्त‎ येणाऱ्यांचा अाेघ याच‎ रस्त्यावरून असताे. त्यामुळे‎ दरराेज सकाळी ९ ते १२ व‎ दुपारी ४ ते ८ या वेळेत‎ दिवसभरात अनेक वेळा‎ वाहतूक काेंडीचा सामना‎ करावा लागत असताे.‎