आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचा चटका आणि दिवसभर उकाडा:जळगाव शहर @350; श्रावणसरींनी दिलासा

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दांडी मारलेली असताना ढगाळ वातावरण निवळल्याने उन्हाची तीव्रता वाढली. तापमान ३५ अंशांपर्यंत वाढल्याने उकाडा वाढला आहे. शनिवारी उन्हाचा चटका आणि दिवसभर उकाडा वाढलेला असताना सायंकाळी शहरात श्रावणसरी काेसळल्या. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा आल्याने नागरिकांना सायंकाळी माेठा दिलासा मिळाला.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली. पावसासाेबतच आकाशातील बाष्पयुक्त ढग कमी झाले आहेत, त्यामुळे दिवसभर उन्हाची तीव्रता वाढलेली जाणवते. शनिवारी सकाळी ७ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता अधिक हाेती. तापमान वाढल्याने वातावरणात उकाडा जाणवत हाेता. दिवसभर हीच स्थिती असल्याने घामाच्या धारांनी नागरिकांना हैराण केले हाेते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात श्रावणसरी काेसळल्या. पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...