आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी ही बनवाबनवी:50 हजारांच्या अर्थसहाय्यासाठी कोविडमुळे मृत्यू न झालेल्यांच्या नातेवाईकांनीही केले अर्ज

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड 19 या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाकडून 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. हे अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कोविडमुळे मृत्यू न झालेल्यांच्या नातेवाईकांनीही अर्ज केल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या निदर्शनास आले आहे.

बोगस अर्जासह जिल्हा, राज्याबाहेर कोविडमुळे मृत्यू झालेले व कागदपत्रे वेबसाइडवर अपलोड नसलेले असे एकूण 183 अर्ज समितीने नामंजूर केले आहेत.

4 हजार 270 अर्ज

शासनाचे 50 हजारांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी जिल्ह्यातून 4 हजार 270 हजारांवर ऑनलाइन अर्ज शासनाच्या कोविड रिलिफ या वेबपोर्टलवर करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील अर्जांची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून पडताळणी करण्यात आली. ते अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अर्ज मंजूर करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्थसहाय्य मिळण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत.

सुनावणी सुरू

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे. अर्ज नामंजूर झालेल्या नागरिकांनी जिल्हास्तरावरील तक्रार निवारणासाठी हरकती दाखल केलेल्या होत्या. त्याबाबत तक्रार निवारण समितीकडून नामंजूर अर्जांवर सुनावणी घेतली. मनपास्तरावरील नामंजूर अर्जांबाबत प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांची तक्रार निवारण समिती सुनावणी घेत आहे.

कागदपत्रांची पूर्तता

सुनावणीमध्ये अर्जदारांकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येत आहे. मंजूर करण्यात आलेल्या अर्जांबाबत जिल्हास्तरीय समितीकडूनही सुनावणी घेण्यात येत आहे. उर्वरित अर्जांवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे.

165 अर्जदार गैरहजर

ग्रामीण भागातून पोर्टलवर 4 हजार 270 अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी समितीने 3 हजार 150 अर्ज 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी मंजूर केले आहेत. त्यापैकी जिल्हास्तरीय समितीकडे 1 हजार 47 अर्जांबाबत सुनावणी झाली. त्यामध्ये 666 अर्ज मंजूर करण्यात आले तर 183 अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामध्ये कोविडमुळे मृत्यू झालेला नसतानाही, सारी या आजाराने मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचे अर्ज, जिल्हा, राज्याबाहेर कोविडमुळे झालेला मृत्यू, पोर्टलवर कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा अर्ज नामंजूर झालेल्यांमध्ये समावेश आहे. सुनावणीबाबत कळवूनही 165 अर्जदार गैरहजर राहिले. 24 अर्जांचे कागदपत्रे प्रलंबित आहेत.

बातम्या आणखी आहेत...